Salman Khan ला पुन्हा धमकी, तर झिशान सिद्दिकी रडारवर; फोन करत केली मोठी मागणी (फोटो सौजन्य-X)
Salman Khan and Zeeshan Siddique Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांना फोनवरुन धमकी देण्यात आली. आमदार झिशान सिद्दीका यांच्या कार्यालयात याबाबत धमकीचा फोन आला असून निर्मल नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निर्मल नगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी केली असता, कॉल करणारी व्यक्ती नोएडातील असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांनी आरोपीला नोएडा येथून अटक केली. त्याचे वय 20 वर्षे आहे. गुरफान खान असे आरोपीचे नाव आहे. धमकी देणाऱ्या तरुणाने थेट पैशांची मागणी केली नसून, या बहाण्याने काही पैसे मिळवण्याचा त्याचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा: पुण्यातील शॉर्पशूटरला संभाजीनगरमधून पकडले; पाचोडच्या टोलनाक्यावर रंगला थरार
काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांची जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेव्हा ही धमकी देण्यात आली आहे. सलमान खानशी असलेल्या जवळीकीमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही हत्या घडवून आणल्याची चर्चाही सुरू झाली. मात्र, पोलीस विविध पैलूंचा तपास करत आहेत. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. गेल्या शुक्रवारी आरोपींनी झीशान सिद्दिकीच्या कार्यालयात धमकीचा फोन केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुफरान खानला रविवारी सकाळी अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. शुक्रवारी आरोपींनी झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात फोन करून पैशांची मागणी केली होती. त्याचबरोबर पैसे न दिल्यास झीशान आणि सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
आरोपी गुफरान खान नोएडामध्ये लपल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक नोएडा येथे आले होते. गुफरान हा बरेलीचा रहिवासी आहे. आरोपी गुफरान याने व्हॉट्सॲप कॉलद्वारे धमकी दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कार्यालयातील कर्मचाऱ्याने झिशान सिद्दीकी यांनी मुंबईतील निर्मल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींचा कोणत्याही टोळीशी संबंध असल्याचे समोर आलेले नाही. मात्र, यापूर्वी हे काम लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांकडून केले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात होती.
हे सुद्धा वाचा: चंदन चोरांवर उपचार करणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होणार; आयुक्त अमितेश कुमार
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलीस आरोपी गुफरान खानला त्यांच्यासोबत घेऊन जात आहेत. आता पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा करणार आहे. मात्र, त्याचा पूर्वीचा काही गुन्हेगारी इतिहास आहे का, याचा शोध यूपी पोलीस करत आहेत. पोलीस बरेलीमध्ये आरोपीच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.
झिशान सिद्दीकीचे वडील बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी रात्री गुन्हेगारांनी हत्या केली होती. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर गुन्हेगारांनी हा गुन्हा केला. त्यानंतर काही दिवसांनी झीशान सिद्दीकीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.