बदलापूरमध्ये पुन्हा नात्याला काळिमा! वडिलांनीच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार (फोटो सौजन्य-ट्विटर)
बदलापूरमध्ये पुन्हा माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, “आरोपी त्यातच पोटच्या अल्पवयीन मुलीला अनेकदा मारहाण करायचा आणि तिच्यावर अनेकवेळा लैगिंक अत्याचार करायचा. ही घटना 22 ऑगस्ट रोजी घडली असून अल्पवयीन मुलगी घाबरून घरातून पळून गेली होती. परंतु नंतर परत आली. सोमवारी तिने पोलिसात जाऊन वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.
अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (लैगिंक अत्याचार), 74 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे) आणि 75 (लैंगिक छळ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. कलम 118 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा: तरुणीची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोकं, हात, पाय, धड कापले अन्…, पुण्यातील धक्कादायक प्रकार
काही दिवसांपूर्वीच बदलापूरमध्ये दोन चार वर्षांच्या मुलींचे शाळेतील लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले होते. यानंतर बदलापूरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती.या घटनेच्या विरोधात लोकांनी निदर्शनेही केली. एवढेच नाही तर लोकांनी रेल्वे स्थानकावर गाड्या थांबवून निदर्शने करून दोन्ही मुलींना न्याय देण्याची मागणी केली. या घटनेचा मोठा निषेध झाला, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.
हे सुद्धा वाचा: ‘ती ओरडत होती म्हणून तिचा गळा दाबला’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? आरोपी संजय रॉयची संतापजनक कबुली
१२ व १३ ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलीने आपल्या घरी घडलेली त्यासंबंधीची घटना सांगितल्यानंतर मुलीच्या वडिलांनी शाळेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. परंतु, शाळेने याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत आणि पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. या घटनेविरोधात १६ ऑगस्टला एफआयआर नोंदविण्यात आला आणि १७ ऑगस्टला आरोपीला अटक करण्यात आली.