पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल (File Photo)
शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गणपती मंदिराच्या पार्किंगजवळ केवल इंगोले हा तरुण उभा असताना त्याला निर्जनस्थळी नेऊन लुटले. त्यामध्ये त्याचा मोबाईल व दुचाकी जबरदस्तीने काढून घेऊन पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर दुचाकी परत दिल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे टिन्या शेळके, तुषार अहिरे, अक्षय जाधव व साकिब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का, आणखी एका बडा नेत्याने साथ सोडली, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार!
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गणपती मंदिराच्या पार्किंगजवळ केवल इंगोले हा उभा असताना टिन्या शेळके व त्याच्या साथीदारांनी केवल याला त्याच्या दुचाकीसह (एमएच २९ बीएल ५७०७) भांबर्डे रोड येथील एका पडीक बिल्डिंगमध्ये घेऊन गेले. तेथे जात त्याला हाताने मारहाण करत शिवीगाळ दमदाटी करून त्याच्याजवळील मोबाईल व दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर काही वेळाने केवल याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन त्याची दुचाकी त्याला परत दिली आणि पाच हजार रुपये व मोबाईल घेऊन सर्वजण पळून गेले.
दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत केवल परमेश्वर इंगोले (वय २४ वर्षे रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. लोणीसा ता. डिग्रस जि. यवतमाळ) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी टिन्या शेळके, तुषार अहिरे, अक्षय जाधव, साकिब शेख (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.
चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच
राज्यात लुटमार करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून लुटमारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एरंडवणे परिसरातील डीपी रस्त्यावर रनिंग करणाऱ्या तरुणाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात अलंकार पोलिसांना यश आले. या चोरट्यांकडून तलवार, दुचाकी, दोन सोनसाखळ्या, पेडेंट असा २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Cyber Crime: “माझ्या लग्नाला या”, निमंत्रण पत्रिका उघडताच बँक खाते रिकामे झाले, काही क्षणातच ७५ हजार रुपये गायब!