फोटो सौजन्य - सोशल मिडिया
South Africa vs England 2nd ODI : दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांचे एक दिवसीय मालिका सुरू आहे. पहिला सामनामध्ये दक्षिण आफ्रिकेचे संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती काल दुसरा सामना पार पडला. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुन्हा एकदा इंग्लंडच्या संघाला त्यांच्या घरचा मैदानावर पराभूत करून मालिका नावावर केली आहे. मॅथ्यू ब्रीट्झके आणि स्ट्रिटन स्टॅब्स यांच्या जोडीने संघासाठी कमालीची कामगिरी केली.
या दुसऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. सामान्यबद्दल सांगायचे झाले तर इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत ५० ओवर मध्ये ८ विकेट गमावून ३३० धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचे सलामी वीर फलंदाज एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन या दोघांनीही संघाला चांगले सुरुवात करून दिली.
🚨 MATCH RESULT 🚨
The Proteas held their nerve at Lord’s with brilliant death bowling to claim victory by 5 runs! 🔥
A 2-0 lead means the Proteas have sealed the ODI series with a game to spare. 🇿🇦🏆#WozaNawe pic.twitter.com/0kj1hZTVpL
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 4, 2025
एडन मायक्रमने आणखी एकदा चांगली खेळी खेळत संघासाठी ४९ धावा केल्या. तर रायन रिकेल्टन याने 35 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बहुमा स्वस्तात बाद झाला. मॅथ्यू ब्रीट्झके या दुसऱ्या सामन्यांमध्ये सर्वत्तम खेळी खेळली त्याने 85 धावांची महत्त्वाची खेळी खेळत संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर ट्रीस्टन स्टॅब्स याने संघासाठी 58 धावांची खेळी खेळली.
ब्रीट्झकेच्या स्फोटक फलंदाजी आणि ट्रिस्टन स्टब्सच्या योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला. आफ्रिकेच्या बाजूने केशव महाराज आणि नांद्रे बर्गर यांनी चेंडूने चमत्कार केले. दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले होते. दक्षिण आफ्रिकेने ही मालिका २-१ अशी जिंकली होती. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर हरवणे ही मोठी गोष्ट होती. आता त्यांनी इंग्लंडविरुद्धही असेच काहीसे केले आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ चमत्कार करत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज मॅथ्यू ब्रिट्झके त्याच्या एकदिवसीय पदार्पणापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मॅथ्यूने ८५ धावांची शानदार खेळी केली. यासोबतच त्याने एक मोठा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला आहे. सलग पाच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यासह मॅथ्यू ब्रिट्झकेने नवजोत सिंग सिद्धूचा ३८ वर्ष जुना विक्रमही मोडला आहे.