डोंबिवली येथून एक फसवणुकीची मोठी बातमी समोर आली आहे. बनावट सोनाच्या नाण्यांच्या बदल्यात तब्बल १० लाख ३३ हजार रुपये किमतीचा सोन्याचा कंठीहार घेऊन आरोपी पसार झाला आहे. यामुळे दुकानदाराला लाखोंचा गंडा घातला गेला आहे. ही घटना डोंबिवली पूर्वमधील टिळक रस्त्यावर असलेल्या श्री देवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भर दिवस झालेल्या या घटनेने डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील सराफ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस करत आहे. शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
Malegaon News: अल्पवयीन मुलगी मदत मागायला गेली आणि वासनेची शिकार झाली! MIM नेत्याला अटक; गंभीर आरोप
नेमकं काय घडलं?
श्री देवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानावर शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. श्री देवी ज्वेलर्स या दुकानात एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केला. यानंतर त्याने दुकानातील महिला कर्मचारी पूजा विनायक दळवी यांना पत्नीचा वाढदिवस असल्याचे सांगितले. तसेच त्याने मला पत्नीसाठी एक सुंदर आणि भारदस्त सोन्याचा हार घ्यायचा आहे, असे सांगितले. यानंतर पूजा यांनी दुकानातील विविध हार दाखवले. त्याने पूजा यांच्याकडून वेगवेगळे हार पाहिले. अखेर त्याला १० लाख ३३ हजार रुपये किंमतीचा एक कंठीहार आवडला.
या हाताची किंमत निश्चित झाल्यावर त्याने त्या हाताच्या बदल्यात त्याच्याजवळील सोन्याची नाणी देऊ असे म्हंटले. पूजा यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती नाणी घेतली. यानंतर तो हार घेऊन तो दुकानातून बाहेर पडला. काही वेळानंतर पूजाने त्या नाणी तपासणीसाठी एका अनुभवी ज्वेलर्सकडे पाठवली, तेव्हा ही धक्कदायक बाब समोर आली. त्याने दिलेली सर्व नाणी पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तोपर्यंत तो भामटा पसार झाला होता. या फसवणुकीमुळे दुकानदाराचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी महिला कर्मचारी पूजा दळवी यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा (कलम ४२०) दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. या प्रकरणाने सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांना अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला