कोपरखैरणे : काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास नेरूळ (Nerul) येथे कारने जात असताना बांधकाम व्यावसायिकावर (Builder) गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सावजी पटेल (Savji Patel) असे असून ते बांधकाम व्यावसायिक होते. नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. नेरूळ येथे सावजी पटेल हे आपल्या वाहनातून जात असताना एका दुचाकीवर आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी त्यांच्या छातीत आणि पोटात अशा तीन ते चार गोळ्या झाडल्या. पटेल यांचा गाडीतच मृत्यू झाला.
घटना स्थळी गोळ्यांच्या तीन रिकामी काडतुसे मिळून आली आहेत. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे (Amit Kale, Deputy Commissioner of Crime Branch) यांनी दिली.
[read_also content=”SRA प्रकल्पाचे भाडे न भरणे ही दडपशाहीच, ३०० झोपडपट्टीधारकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या विकासकाची उचलबांगडी आणि दंडही ठोठावला; उच्च न्यायालयाने नोंदवले मत https://www.navarashtra.com/maharashtra/non-payment-of-sra-project-rents-not-only-repression-but-also-the-developer-who-left-300-slum-dwellers-stranded-and-fined-high-court-recorded-opinion-nrvb-376354.html”]
सावजी पटेल हे आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तुल रोखून या गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज झाल्याने स्थानिक भयभीत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षात याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सावजी पटेल यांचा मृतदेह गाडीत आढळून आला.
पोलिसांना घटनास्थळी तीन रिकामी काडतुसे सापडली असून पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. या हत्येच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर नवी मुंबई (Navi Mumbai) पुन्हा या हत्येने हादरली आहे.बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाल्याने पोलीस देखील सतर्क झाले आहेत.
बेलापूर सेक्टर पंधरा येथील इंपिरीया ग्रुपचे सावजी पटेल (वय ६५) यांची नेरूळ सेक्टर सहा येथे भररस्यात गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (दि. १५) संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. बिल्डर पटेल हे कारने नेरूळ सेक्टर सहा अपना बाजार समोरील रस्त्याने जात होते. दरम्यान मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी कार अडवून गोळ्या झाडल्या.
[read_also content=”त्याचं डोकं फिरलंया! दाखवतोय पैशांचा माज, चालत्या गाडीतून उधळतोय नोटा; VIRAL VIDEO ने घातलाय राडा https://www.navarashtra.com/viral/shocking-money-matters-for-a-crazy-person-man-blows-notes-from-moving-car-viral-video-creates-sensation-nrvb-376321.html”]
यामुळे गंभीर जखमी झालेले ते जागीच ठार झाले. या घटनेची माहिती कळताच डीसीपी अमित काळे, डीसीपी पानसरे यांच्यासह क्राईम ब्रँचच्या अधिकारी आणि नेरूळ पोलीस ठाण्याचे पीआय यांनी घटनास्थळी पाहणी केली. हा खून जमिनीचा व्यवहार, प्राप्रटी किंवा इतर फिसकटलेल्या आर्थिक व्यवहारातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. इंपिरीया ग्रुपचे पटेल यांच्यासह पाच जण भागीदार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
नवी मुंबईत यापूर्वी देखील एस के लाहोरीया यांच्यावर हल्ला झाला होता आणि आज पुन्हा नेरूळ सारख्या शांततेच्या परिसरामध्ये गोळीबार झाल्यामुळे संपूर्ण नवी मुंबई परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.