बीड: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने आपल्या आईला लोखंडी पाईपने मारहाण केली. यामारहाणीमुळे ती जखमी झाली. मुलाने जखमी अवस्थेत आईला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान आईने आपले प्राण सोडले. आपल्या पोटच्या गोळ्यानेच, आपल्याच मुलाने लोखंडी पाईपने केलेले आघात आईला सहन न झाल्याने या उपचारादरम्यान आईने जीव सोडला. मृत महिलेचे नाव सुवर्णमाला बांगर असं असून दत्त्ता बांगर असं आरोपी मुलाचं नाव आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Thane Crime : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक, तब्बल ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नेमकं काय घडलं?
धारूर तालुक्यातील तरनळी गावात सुवर्णमाला आपल्या घरासमोर बसल्या होत्या. तेव्हा त्यांचा मुलगा दत्ता बांगर याने घरात जाऊन लोखंडी पाईप आणत त्याच पाईपने आईच्या डोक्यात मारहाण केली. मारहाण करतांना दत्ता याचा लहान मुलगा देखील समोर आला होता. मात्र, दत्त हा मारहाण करतांना थांबला नाही. त्यावेळी त्यांच्या बाजूला असलेल्या भावजाईला देखील दत्ता बांगर याने जीवे मारण्याची धमकी दिली. दत्ताने आईला मारल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. म्हणून दत्ताने आईला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वादाती रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दत्त बांगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक देखील केली आहे. याप्रकरणी, आरोपी दत्ता बांगरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आरोपी दत्ता याचा सर्व कुटुंबाला त्रास आहे. यापूर्वीही त्याने त्याच्या चुलत्याला त्रास दिला होता. त्यामुळे, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. जर तो तुरंगातून सुटला तर दत्ता त्याच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना पुन्हा मारहाण करू शकतो. त्याच्यापासून या सर्वांच्या जीवाला धोका असल्याचे त्याच्या बहिणीने माध्यमांनाही बोलतांना म्हंटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
Satara Crime: घरकाम करणाऱ्या बाईकडून दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून साडेदहा तोळे सोने हस्तगत