पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan Train Accident news in Marathi : इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वामध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने हाहा:कार माजवला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पुन्हा एक भीषण रेल्वे अपघात (Train Accident) घडला आहे. रविवारी सकाळी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये प्रवासी ट्रेनचे ४ डबे रुळावरुन घसरले.
या भीषण अपघातात एका प्रवाशाच्या मृत्यू तर २० जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून यातील २ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये प्रवाशांनी भरलेली एक ट्रेन लोधरान रेल्वे स्थानकाजवळ रुळावरुन घसरली.
ही ट्रेन पेशावरहून कराचीला रवाना झाली होता. यावेळी हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आतापर्यंत १९ जणांना वाचवण्यात आले आहे. अपघातानंतर पेशावर-कराचीचा हा मार्ग काही तासांसाठी बंद होता. सध्या रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
यापूर्वी देखील पाकिस्तानमध्ये अनेक रेल्वे अपघात घडले आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये इस्लामाबाद एक्सप्रेसचा रेल्वे रुळावरुन घसरुन अपघात झाला होता. यामध्ये ३० लोक जखणी झाल्याचे वृत्त मिळाले होते. तसेच गेल्या सोमवारी मुसा पाक एक्सप्रेसचाही अपघात झाला होता. या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले होते.
याच वेळी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात मुसळधार पावसामुळे आणि पूरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोक पूरात वाहून गेले आहेत. तसेच गेल्या ४८ तासांत मृतांचा आकडा ३२७वर पोहोचला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या बुनेर, शांगला, मानसेहरा, बाजौर, स्वात, बट्टाग्राम, लोअर दिर, अबोटाबाद हे जिल्ह्ये प्रभावित झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्येही (POK) पाऊस आणि पूराममुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरे, वाहने, शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ हजार बचाव कर्मचारी सध्या सक्रिय आहेत. पण ही मदतही अपुरी पडत आहे. पाकिस्तान ९ जिल्ह्यांमध्ये मदत पोहोचवणे अत्यंत कठीण होत आहे. अनेक भागामध्ये भूस्खलन आणि पूरामुळे मदत कार्य पोहोचण्यात अडचणी येत आहे. बंद रस्ते आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.
ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत