दहीहंडीच्या दिवशी शिर्डीत एक धक्कदायक घटना घडली आहे. २१ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत निर्घृण हत्या केली. ही हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. सानूकुमार ठाकूर ( 21 वर्षे, रा. शिर्डी) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.
दोन आरोपीला अटक
आरोपींची नावे साई कुमावत आणि शुभम गायकवाड अशी आहे. दोघेही शिर्डीतील रहिवासी आहेत. घटनेनंतर काही तासातच शिर्डी पोलिसांनी दोघांना तात्काळ अटक केली आहे. आरोपी आणि मृतकाच्या मधात पूर्वीपासून वाद होते. त्याच वादातून रंगाच्या भरात ही हत्या झाल्याचा संशय आहे. ही घटना 16 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
शिर्डी पोलीस ठाण्यात मृत सानूकुमारचे वडील नवीनकुमार ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 115(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे. हत्या नेमकी का झाली? नेमका वाद काय होता, याची चौकशी पोलीस करत आहेत. ही घटना घडताच स्थानिक नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. राहाता तालुक्यात शिर्डीपासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केलवड-को-हाळे शिवारात विहिरीत पाच मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणात वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा संशय आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
आरोपीचं नाव अरुण सुनील काळे (वय 35) असं नाव आहे. अरुण त्याच्या पत्नीला कायम मारहाण करत होता. त्यामुळे पत्नी घर सोडून वेगळी राहत होती. ही मुलं श्रीगोंदातील मेहकरमधील ही सर्व मुलं आहेत. ती अहिल्यानगर तालुक्यातील वीरभद्र प्राथमिक शाळेत शिकत होती. पत्नी नांदायला येत नसल्याने संतापलेल्या पत्नीला नांदायला ये अन्यथा मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती. काळेंनी मुलांची कटिंग करून आणतो असे सांगून शाळेत गेला होता. त्यानंतर तो मुलांना शाळेतून घेऊन गेला आणि पसार झाला. त्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळले.
धक्कदायक म्हणजे मुलांच्या आईने शाळेत फोन करून सांगितलं होतं की मुलांना वडिलांच्या ताब्यात देऊन नका. पण तो पर्यंत शाळेने मुलांना वडिलांच्या ताब्यात दिलं आणि पुढील अनर्थ घडला.