मुंबई : काही दिवसांपुर्वी मुंबईत एका मुलीने तिच्या आईची हत्या करुन मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन घरात ठेवल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनं मुंबईसह संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आता मुंबईतील माहिम परिसरातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. माहीम परिसरात बुधवारी पहाटे प्लॅस्टिकच्या पिशवीत दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
[read_also content=”देशात वाढतोय कोरोना! गेल्या 24 तासात 10,542 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 38 जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/latest-news/in-the-last-24-hours-10542-new-corona-patients-were-recorded-38-people-died-nrps-387252.html”]
प्लॅस्टिकच्या पिशवित आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, शिव- माहीम लिंक रोड येथे एका प्लॅस्टिकच्या पिशवित मुलाचा मृतदेह आढळला असल्याचा फोन मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. त्या मुलाच्या तोंडातून फेस निघत होता आणि त्याचे हात उंदराने कुरतडले होते. पोलिसांनी मुलाला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
Web Title: Body of a child was found in a plastic bag in mumbai mahim area nrps