bomb (फोटो सौजन्य: social media)
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (१० मे) उशिरा युद्धबंदी जाहीर करण्यात आली असली, तरी पाकिस्तानने त्यानंतर काही तासांतच युद्धबंदीचे उल्लंघन करत पुन्हा एकदा आपल्या कुरापतीखोर स्वभावाचे दर्शन घडवले. अनेक तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन (Pakistan Violates Ceasefire) केले. नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानी सैन्याकडून केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारताने ठोस प्रत्युत्तर दिले असून, सर्व ड्रोन हल्ले भारतीय लष्कराने यशस्वीपणे परतवून लावले.
समाजमाध्यमांवर पाकिस्तान झिंदाबादचा मजकूर; पुणे पोलीसांनी तरुणीला घेतले ताब्यात
परंतु आता एक अमरावतीतुन मोठी एक बातमी समोर आली आहे. सकाळी दहा वाजताच्या सुमारास प्रशांत ठाकूर हे व्यक्ती एमआयडीसी मधील व्हेरिटो कंपनीमध्ये कर्मचारी आहेत. याच व्यक्तीच्या मोबाईल फोनवर व्हाट्सअपद्वारे कॉल करून दिल्लीसह चार ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली.मजुराने भीतीपोटी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस प्रशासन आता सज्ज झाले आहे. सध्या या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली आहे.
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीचा संताप
छत्तीसगडच्या बलरामपूर- रामानुजगंज जिल्ह्यातील कुसमी पोलीस स्टेशन अंतर्गत चैनपूर पंचायतीच्या पहाडी कोरवा वस्तीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. तिने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता म्हणून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पाटील अटक केली आहे. आरोपीचा नाव बबुआ कोरवा (वय 25) अशी आहे. ही घटना बुधवारी रात्रीची आहे.
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीचा संताप, पत्नीची केली हत्या