पत्नीने केला पतीचा खून (फोटो - istock)
इचलकरंजी : महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. रक्तदाब वाढल्याचा बचाव करत अटक टाळण्यासाठी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला राठी रुग्णालयातून फरार झाला आहे. दै. ‘नवराष्ट्र’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच एसीबीचे अधिकारी हडबडून जागे झाले. त्यांनी राठी उपचार घेत असलेल्या रुग्णालयासह त्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर राठी अटक टाळण्यासाठी फरार झाल्याचे आढळून आले.
इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले होते. आपण रंगेहात पकडल्याचे लक्षात येताच राठीचा रक्तदाब अचानक वाढला. सुरुवातीला त्याची महापालिकेच्या आयजीएम रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर तो एका खासगी रुग्णालय उपचार घेत होता. अटक टाळण्यासाठी त्याने अर्ज केला होता, तरीही एसीबीने त्याला अटक करण्याची तसदी घेतली नाही. एसीबीच्या जाळ्यात सर्वसामान्य सापडला तर त्याला तत्काळ अटक केली जाते. मात्र, बडा मासा असला की एसीबीच्या यंत्रणेचा कणखरपणा कुठे गळून पडतो? याचा आता वरिष्ठ पातळीवरून शोध घ्यावा लागणार आहे.
काश्मीर उन्हाळ्यात उपचार घेणाऱ्या प्रशांत राठी आता रक्तदाब कमी झाला आहे काय, याची माहिती घेऊन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटकेची कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या राठीला अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी प्रयत्न करणारी समांतर यंत्रणा कार्यरत होती.
सर्वसामान्य लाचखोराला ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या एसीबीने प्रशांत राठीसारख्या बड्या धेंड्याला का व्हीआयपी ट्रीटमेंट दिली? याचीही आता वरीष्ठ स्तरावरून चौकशी करावी लागणार आहे. एकीकडे लाचखोरांची निर्भयपणे तक्रार करा, असे आवाहन करणाऱ्या एसीबीने बड्या लाचखोरालाच मदत करण्याचा सपाटा लावला असल्याचे अलीकडे घडलेल्या काही प्रकरणावरून जाणीवपूर्वक दिसून येते.
प्रशांत राठी याने अटकपूर्व जामीनासाठी इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. त्याच्या अर्जावर मागील काही दिवसांपासून सुनावणी सुरू असून, न्यायालयाने सोमवारी (दिं.२) तारीख निश्चित केली आहे. या दिवशी राठी याला ‘जेल की बेल’ हे निश्चित होणार आहे.