छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील एका उद्योजकाच्या घरी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी तब्बल ८ किलो सोनं आणि ४० किलो चांदी, असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला आहे. उद्योजकांचा नाव संतोष राधाकिशन लड्डा आहे. यांच्याच घरी हा मोठा दरोडा पडल्याची धक्कदायक घटना घडली.
ससून हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, तपासात सुरक्षारक्षकाचा धक्कादायक उलगडा
मिळालेल्या माहिती नुसार, संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे. त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी परदेशात गेले होते. लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. दरोडेखोरांनी घरात असलेल्या ड्रायव्हर आणि केअरटेकरच्या हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. केयरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवत धमकी देत संपूर्ण घराची झडती घेतली आणि मौल्यवान दागिने व चांदी चोरून नेले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरु आहे. पोलीस आपले चक्रे वेगात फिरवत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.