मुंबई : शिंदे गटाचे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन (Political Agitation) केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने (Girgaon Court) कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे.
आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता.
बच्चू कडू आज न्यायालयासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालायने फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.