समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या गोळीबारात गोळी थेट एका कर्मचारीच्या पोटात घुसली. त्याच्यावर उपचार सुरु आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास टोलनाका परिसरातील एका खोलीत घडला. हा गोळीबार का करण्यात आला याचा कारण आता समोर आला आहे.
‘पिस्तूल खरी की खोटी’ असे दाखवताना गोळी झाडली गेली आणि यात एक कर्मचारी धक्कदायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही कर्मचारी रेकोरवरील गुन्हेगार असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भारत विजय घाटगे आणि करण सोमनाथ भालेराव हे दोघेही सावंगी गावाचे आहे. हे दोघे मित्र समृद्धी महामार्गाच्या सावंगी टोल नाक्यावर सुरक्षा कर्मचाऱ्याचे काम करत होते. शुक्रवारी १२ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोघे टोलनाक्यावरील एका खोलीत बसले होते. यावेळी करण याने त्याच्याकडे असलेले पिस्तूल काढून भरताला दाखवले. भरतने ते नकली असल्याचा अंदाज व्यक्त केला.
परंतु ही पिस्तूल खरी असल्याचे करण ने सांगत, “तुला चालवून दाखवू का?” असे म्हणत ट्रिगर दाबले. त्यावेळी पिस्तूलमधून गोळी झाडली गेली आणि ती थेट भरतच्या पोटात घुसली. त्यानंतर घटनास्थळी एकाच गोंधळ उडाला. जखमी भरतला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, या दोघांविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अश्या व्यक्तींना समृद्धी महामार्गासारख्या महत्वाच्या प्रकल्पावर कर्मचाऱ्याच्या भूमिकेत कसे नेमले गेले? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणावर पोलीस आता काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
अर्धनग्न करत कामगाराला अमानुष मारहाण; जागीच मृत्यू; कारण अस्पष्ट
दरम्यान, छत्रपती संभाजी नगर येथून एक मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास एका २३ वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबेलोहळ येथील गट नंबर 37 ला घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अर्जुन रतन प्रधान असे आहे.