बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका उपसरपंचाला भर रस्त्यावर काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ही मारहाण उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना करण्यात आली.
‘स्मार्ट’ चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तपासातून धक्कादायक प्रकार उघड
का करण्यात आली मारहाण?
बीडच्या निपाणी टाकळी येथील ग्रामसभेत उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी बोगस काम करून बिलं उचलू नका, असे आवाहन केले होते. या ग्रामसभेनंतर तू ग्रामसभेत बोगस कामासंदर्भात कसा काय बोलला? असा जाब विचारत सरपंच पती भगवान राठोड, जयकोबा राठोड आणि इतर 4 ते 5 जणांकडून माजलगाव-परभणी या रस्त्यावर उपसरपंच चव्हाण यांना काठी दगडाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आलीय. या मारहाणीत चव्हाण हे गंभीर जखमी झाले. तर जखमी उपसरपंचावर बीड जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु असून या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र या निमित्याने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याचे बघायला मिळाले आहे.
बीडमध्ये चाललंय तरी काय? माजी सरपंचाचा तरुणावर कोयत्याने वार, रुग्णालयात उपचार सुरु…..
बिड मध्ये चाललंय तरी काय? असा सवाल सातत्याने विचारण्यात येत आहे. कारण मारहाणीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. आता बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी गावात माजी सरपंचाने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शेत रस्त्याच्या वादातून हा हल्ला करण्यात आले आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचं नाव प्रकाश काशीद असं आहे.
नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी गावात माजी सरपंच गोरख काशीद याने रस्त्याच्या वादातून प्रकाश काशिदच्या डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं.प्रकाश काशिदला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या झालेल्या हल्ल्यामुळे गावात
एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गोरख काशीद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी माजी सरपंचाला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी माहिती दिली की, “साक्षाळ पिंपरी गावात झालेल्या हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कोयत्याचा वापर करून केलेला हल्ला हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असल्याचं समोर आलं आहे.