रायपूर : छत्तीसगडच्या (Chhattisgarh) रायपूर जिल्ह्यात, एका व्यक्तीने आपल्या आई-वडिलांची (Parents Murder) आणि प्रेयसीची (Girlfriend Murder) (Chhattisgarh Murder Case) ही भीषण घटना घडवून आणताना पहिली हत्या (Murder) केली. यानंतर त्याने त्यांचे मृतदेह घरातच पुरले (The Body Was Buried In The House). आता या गुन्ह्यात न्यायालयाने त्या व्यक्तीला शिक्षा सुनावली आहे. या निर्घृण गुन्ह्यासाठी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दोषी उदयन दासने (Udayan Das) २०१० मध्ये रायपूरमध्ये आपल्या आई-वडिलांची हत्या केली होती आणि त्यांचे मृतदेह डीडी नगरमधील त्याच्या घराच्या बागेत पुरले होते. २०१६ मध्ये उदयनला त्याच्या प्रेयसीच्या हत्येप्रकरणी भोपाळच्या राहत्या घरातून अटक केल्यानंतर ही हत्या उघडकीस आली.
पश्चिम बंगालच्या बांकुरा येथे राहणाऱ्या आकांक्षा उर्फ श्वेता हिची उदयनशी २००७ मध्ये सोशल मीडियावर मैत्री झाली होती. जून २०१६ मध्ये आकांक्षा घर सोडून भोपाळला नोकरीसाठी गेली आणि साकेत नगरमध्ये उदयनसोबत राहू लागली. तिने घरच्यांना सांगितले की ती अमेरिकेत काम करते. जुलै २०१६ नंतर आकांक्षाचा तिच्या कुटुंबाशी संपर्क तुटला तेव्हा तिच्या भावाने तिचा भोपाळमधील नंबर ट्रॅक केला.
[read_also content=”इंजिन ऑईल लीक झाल्याचा केला बहाणा, थांबवली ज्वेलर्सची गाडी ; संधी साधत ५० लाखांचे दागिने घेऊन झाले पसार https://www.navarashtra.com/crime/patna-miscreants-an-engine-oil-leak-was-used-as-an-excuse-stolen-jewellery-of-50-lakhs-from-a-business-person-at-city-area-of-patna-nrvb-366078.html”]
उदयनसोबत तिच्या लिव्ह इन रिलेशनशिपचा संशय आल्याने आकांक्षाच्या कुटुंबीयांनी डिसेंबर २०१६ मध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. उदयनने भोपाळमध्ये प्रेयसी आकांक्षा हिची हत्या करून नंतर तिचा मृतदेह एका पेटीत टाकून बेडरूममध्ये पुरून त्यावर काँक्रीटचा चौथरा तयार केल्याची माहिती मिळाली.
३० एप्रिल २०१७ रोजी बांकुरा पोलिसांनी उदयनविरुद्ध केस डायरीसह ६०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. १९ साक्षीदारांचे जबाब आणि सर्व पुराव्यांच्या आधारे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुरुवातीला हे प्रकरण आकांक्षाच्या हत्येपुरते मर्यादित असल्याचे पोलिसांना वाटत होते. पण चौकशीदरम्यान त्याने २०१० मध्ये आई इंद्राणी आणि वडील व्हीके दास यांची हत्या करून त्यांचे मृतदेह रायपूर येथील घराच्या बागेत पुरल्याचे उघड झाले.
[read_also content=”अवैध मटक्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांनी सुरू केला हत्यारांचा नंगानाच; खंडणी उकळण्याचा होता डाव, पोलिसांनी डावच उधळला, आता खात आहेत तुरुंगाची हवा https://www.navarashtra.com/crime/jharkhand-deoghar-crime-news-illegal-lottery-matka-operation-illegal-pistol-supremacy-battle-judicial-custody-nrvb-366058.html”]