लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच नैराश्येमुळेही अनेकांनी जीवन संपवले आहे. नाशिकमध्ये मुलाच्या लग्नाला अवघे 20 दिवस शिल्लक असताना पती-पत्नीने विष घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच, नागपूरमध्येही हृदय पिळटवून टाकणारी घटना समोर आली.
आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या दाम्पत्याने स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. नागपूरच्या मार्टीननगरातील महिलने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवला. तसेच एक नोट देखील लिहिली. या संपूर्ण घटनेने नागपुरात खळबळ उडाली. जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान केले होते.
75 हजार रुपये घरात ठेवले
नागपुरातील या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवला होता. पती जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी अॅनी जारील मॉनक्रिप असे दोघांचे नाव आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दोघांनी अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये ठेवले असल्याचे सुद्धा चिठ्ठीत नमूद करत माफी मागितली.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी सापडली
आम्हाला मार्टिननगरमध्ये पती-पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती साडे सात वाजता समजली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुरुष ५४ वर्षांचा होता. तर त्यांची पत्नी ४५ वर्षांची होती. या दोघांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यांनी स्टेट्सवरही व्हिडिओ पोस्ट केला होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.
पुण्यात तरूणाची आत्महत्या
काही दिवसांपूर्वी पुण्यातही आत्महत्येची घटना घडली. सावत्र वडीलांकडून होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढव्यातील लक्ष्मीनगर भागात घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी सावत्र वडीलांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय सुमतराव कसोटे (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर, संदीप ऊर्फ शब्बीर इब्राहिम शेख (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संदीपच्या ५१ वर्षीय मावशीने फिर्याद दिली आहे.