नवी दिल्ली : देशाची राजधानी (Capital) दिल्लीत (Delhi) एक धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील बवाना (Bawana in North-West Delhi) येथे एका व्यक्तीने आपल्या ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला (Pregnent Wife) पेट्रोल टाकून पेटवून दिले. या गंभीर गुन्ह्यात महिलेच्या सासरच्या मंडळींचाही (In Laws) सहभाग असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Delhi Commission for Women Chairperson Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
डीसीडब्ल्यूच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, “बवाना येथे ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेला तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी पेट्रोल ओतून जाळले. मुलगी गंभीररित्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. तसेच पीडितेला आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. दिल्लीत गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे.
7-month pregnant woman set on fire by husband & in-laws by pouring petrol in Bawana. Woman suffered serious burn injuries&is undergoing treatment at hospital.We've issued notice to Delhi police & providing all help to victim: Swati Maliwal,Chairperson, Delhi Commission for Women pic.twitter.com/ixxWO7JWzy
— ANI (@ANI) January 9, 2023
[read_also content=”एक उनाड दिवस, महिला आणि पुरूष दोघांनीही पँट काढून केला ट्रेनमधून प्रवास; का साजरा केला जातो दिवस, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/london-the-stiff-upper-lip-society-celebrate-no-pant-day-nrvb-360514/”]