सासवड पोलीस ठाण्यातील वादग्रस्त कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन; नेमकं कारण काय?
काय घडलं नेमकं?
लीलाबाई हिरामण सूर्यवंशी (वय 70) यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासात काही अज्ञात आरोपींनी तोंड दाबून या वृद्ध महिलेची निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. लीलाबाई सूर्यवंशी हलाखीचे जीवन जगत होत्या. परिसरात भीक मागून त्या आपला उधरनिर्वाह करत होत्या. हत्या केल्यानंतर आरोपींनी लीलाबाई यांच्या घरातील गॅस सिलिंडर आणि काही किरकोळ घरगुती वस्तू चोरी करून पोबारा केला. त्यामुळे हा प्रकार केवळ हत्या नसून लुटीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या.
आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली आणि ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. आरोपींचा माग काढण्यासाठी कसून तपास सुरु आहे. या घटनेनंतर संपूर्ण मोहाडी उपनगर परिसर हादरून गेला असून, भीक मागून जगणाऱ्या एका वृद्ध महिलेचा अशी निर्घृण हत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिक करत असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
धुळे व नांदेडमध्ये मोठी कारवाई! 122 गुंठ्यातील गांजाची शेती जाळून नष्ट, 45 किलो गांजा जप्त
धुळे व नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिरपूर तालुक्यातील जामन्या पाणी गावाच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या संपूर्ण कारवाईत वनविभागाच्या हद्दीतील तब्बल 122 गुंठे जागेतील अंदाजे 2 हजार 125 किलो गांजाची झाडे नष्ट करून तब्ब्ल १ कोटी ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तर गांजाची लागवड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime: खाजगी कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून हल्ला, शिक्षक शिकवत होते आणि…
Ans: धुळे शहरातील मोहाडी उपनगर, वाल्मिक वसाहत येथे.
Ans: प्राथमिक तपासानुसार लुटीच्या उद्देशाने हत्या झाली असावी.
Ans: वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू आहे.






