दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?
Disha Salian death case In Marathi : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. माजी अभिनेत्री आणि मॉडेल दिशा सालियनने २०२० मध्ये आत्महत्या केली. आता या घटनेला पाच वर्ष उलटल्यानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण चर्चेत आले आहे. दिशाच्या मृत्यूनंतर 14 जून 2020 मध्ये सुशांत याने देखील स्वतःला संपवलं. दिशाच्या मृत्यूनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहन राय याने मोठा खुलासा केला होता. रोहनने सांगितले दिशाच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर काय घडले?
दिशा सॅलियन मॉडेल आणि अभिनेता रोहन रॉयशी लग्न करणार होती. लग्नाच्या काही दिवस आधी, दिशाने मालाडमधील तिच्या फ्लॅटच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दोन वर्षांनंतर रोहनने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिशाच्या अचानक मृत्यूबद्दल बोलले आहे. रोहनने सांगितले की, दिशा गेल्यानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या.
या प्रकरणी रोहनने सांगितले की, “दिशा खूप संवेदनशील व्यक्ती होती. आम्ही दोघेही दादरमध्ये आमच्या कुटुंबासह राहत होतो, ४ जून रोजी मी तिला सांगितले की चल मालाडमधील अपार्टमेंटमध्ये जाऊया. मी तिला हे विचारून सांगितले की कदाचित यामुळे तिचा मूड बदलेल, आमच्या चार मैत्रिणीही आमच्यासोबत होत्या. त्या दिवशी आम्ही खूप मद्यपान करत होतो, मी एका मैत्रिणीशी फोनवर बोलू लागलो आणि ती बेडरूममध्ये गेली, ती बराच वेळ आली नाही, म्हणून आम्ही सर्वजण तिला शोधू लागलो, मी पाहिले की खोलीची खिडकी उघडी होती. मी तिथून खाली पाहिले तेव्हा मला तिचा पायजमा जमिनीवर पडलेला दिसला, जो पाहून मला भीती वाटली. मलाही आत्महत्या करावीशी वाटली. हे सर्व एका वाईट स्वप्नासारखे होते. दिशा आणि मी सुमारे ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो.”
दिशाच्या आत्महत्येनंतर, रोहनला स्वतः सोशल मीडियावर धमक्या आल्या. रोहन म्हणाला, मला हजारो धमक्यांचे मेसेज आले, लोकांनी मला शिवीगाळ केली, दिशाच्या आत्महत्येनंतर, आमच्यात काही भांडण झाले आहे का हे शोधण्यासाठी पोलिसांनी चौकशीदरम्यान माझे कपडेही काढले. सध्या रोहन रॉय टीव्ही अभिनेत्री शीन दासला डेट करत आहे. आता दिशा सानियल मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.