वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमरावती : वडिलांच्या उपचारासाठी घरी बोलावलेल्या डॉक्टरने रुग्णाला गुंगीचे औषध देऊन रुग्णाच्याच खिशातील 55 हजार रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली. ही घटना 5 नोव्हेंबर 2024 रोजी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिच्छुटेकडी परिसरात घडली होती. याप्रकरणी मुलगा अमीर खान घौस खान पठाण (वय 36) यांनी मंगळवारी (दि. 21) पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणात पोलिसांनी डॉक्टर रहेमान पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला.
हेदेखील वाचा : घरच्या ‘लक्ष्मी’चा चिमुकल्यासमोरच कात्रीने चिरला गळा: रक्ताच्या थारोळ्यातील Video रेकॉर्ड केला; म्हणाला, ‘मी तिला…’
बिच्छूटेकडी येथील आमिर खान पठाण यांचे वडील गौस खान पठाण हे 5 नोव्हेंबर रोजी आजारी पडले. त्यांच्यावर आमिर खान यांनी राहुल नावाच्या तरुणाला फोन करून डॉक्टरला पाठवण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टर रहेमान पटेल हा आमिर खान यांच्या घरी पोहोचला. तुमच्या वडिलांना दोन ते तीन तास उपचार करावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यानंतर डॉ. रहेमानने उपचार सुरू केले. त्या दरम्यान आमिर खान हे कामावर गेले. दुपारी 2 वाजता ते घरी परतल्यानंतर त्यांनी वडिलांना विचारले की, डॉक्टरांनी उपचारासाठी किती वेळ घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, गुंगीचे औषध दिल्यानंतर ते बेशुध्द झाले.
त्यानंतर 1 वाजता डॉक्टर निघून गेले, पण मला आराम मिळाला नाही. मात्र, सकाळी खिशात ठेवलेले 55 हजार रुपये गायब झाले होते. त्यामुळे आमिर खान यांनी डॉ. रहेमानला फोन केला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यानंतर राहुल नावाच्या तरुणाला फोन केला असता त्याचा मोबाईलही बंद असल्याचे दिसून आले, असे आमिर खान यांनी तक्रारीत म्हटले. वडिलांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली नव्हती.
महिलेवर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार
दुसऱ्या घटनेत, पीडित महिला ही ड्रिमलँड मार्केटमधील एका दुकानात लोकर शिवण्याचे काम गुलाम अन्सारीकडून शिकत होती. दरम्यान, 6 ऑगस्ट 2024 रोजी ड्रीमलॅन्डमध्ये धाड पडणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे आरोपीने कारखान्याचे शेटर बंद केले आणि महिलेशी अश्लिल वर्तन सुरु केले. त्यामुळे तिने आरडाओरड केली असता जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर रविवारपासून (दि. 19) पुन्हा पाच दिवस आरोपीने महिलेला धमकावून अत्याचार केला.
हेदेखील वाचा : Shivani Duble Death : नागपूरच्या तरुणीचा पॅराग्लायडिंग अपघातात मृत्यू, अचानक दोर तुटल्याने 100 फुटांवर थेट जमिनीवर