Drunk Thief Enter House For Robbery Sleeps All Night Police Arrested
बोंबला! चोर चोरी करायला गेला, दारु प्यायला अन् तिथेच झोपला, सकाळी घरमालकालाचं विचारतो तुम्ही कोण?
बुधवारी रात्री उशिरा तीन चोरट्यांनी एका घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले, मात्र तिसरा चोर दयालपुरमचा रहिवासी दीपक शुक्ला हा दारूच्या नशेत नग्न अवस्थेत घरात झोपला होता.
चोर चोरी करायला येतो आणि चोरी करताना असं काही होतं की तो स्वत: अडचणीत येतो. त्यामुळे ऐनवेळी फजिती होऊन चोरी पोलिसांच्या तावडीत सापडल्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत. उत्तरप्रदेशमधूनही अशीत एक घटना उघडकीस आली आहे जी ऐकूण तुम्हाला हसू आवरणार नाही. कानपूरमध्ये तीन चोरट्यांनी घरातून चोरी करण्याचा कट रचला होता. मात्र, यातील एका चोरट्याने इतकी दारू प्यायली की, दारूच्या नशेत तो घरातच झोपी गेला. (drunk thief enter house for robbery sleeps all nigh) तर इतर दोन चोरटे घरातील मौल्यवान वस्तू लुटून पळून गेले. सकाळ होताच तो सहजपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.
कानपूरच्या कृष्णा विहार परिसरात बुधवारी रात्री तीन चोरट्यांनी एका बंद घरात प्रवेश केला. दोन चोरटे सामान घेऊन निघून गेले. तिसरा खूप मद्यधुंद असल्यामुळे तिथेच झोपला. सकाळी घरमालक आला आणि तो घरात झोपलेला दिसल्यानंतर त्याला उठवले. तेव्हा तो त्यालाच विचारु लागल. तू कोण आहेस आणि इथे काय करतोय. चोराचे हे प्रश्न ऐकून मालकाने त्याला दोनदा चापट मारली आणि त्याची नशा उतरली. यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या आणखी एका साथीदाराला पकडले आणि तुरुंगात पाठवले, त्यांचा तिसरा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला.
घराची केली होती रेकी
कोळशाचा व्यवसाय करणाऱ्या इंद्रकुमार तिवारी यांच्या शिक्षणतज्ज्ञ पत्नी मनीषा यांना तोंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. सोमवारी त्यांचे निधन झाले. मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर इंद्रकुमार हे त्यांच्या दोन मुली सोनी आणि मोनी यांच्यासह घराला कुलूप लावून त्यांच्या मूळ गावी पातारा तिलसाडा येथे गेले. ही बाब या तिन्ही चोरट्यांना माहिती होतीा. त्यामुळे त्यांनी बुधवारी रात्री उशिरा तीन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले, मात्र तिसरा चोर दयालपुरमचा रहिवासी दीपक शुक्ला हा दारूच्या नशेत नग्न अवस्थेत घरात झोपला होता.
Web Title: Drunk thief enter house for robbery sleeps all night police arrested