तासगाव क्राईम न्यूज (फोटो- istockphoto)
बनावट नोटांमध्ये पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. तासगाव तालुक्यातील विविध गावांमधील भरणाऱ्या आठवडा बाजारामध्ये या बनावट नोटा आणणारी टोळी फिरते, असा संशय व्यक्त होत आहे. पोलिस यंत्रणेकडे या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा: पुणे शहरात बनावट नोटा आढळल्याने खळबळ; गुजरातमधील एकाला अटक
पुणे शहरात बनावट नोटा आढळल्याने खळबळ
पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा गुजरातमधील जामनगरचा आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौरव रामप्रताप सविता ( वय २४, रा.जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई लखन गंगाधर शेटे यांनी फिर्याद दिली आहे.