नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज!
या उपक्रमांतर्गत पीएनजी ड्राइव्ह 2.0 ची दूरदर्शन जाहिरात मोहीम राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून, देशातील सर्व शहर वायू वितरण (CGD) कंपन्यांचा यात सहभाग आहे. ही जनजागृती मोहीम 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीत राबवली जाणार आहे.
या मोहिमेसाठी अभिनेता व खासदार रवी किशन सीएनजीचा, तर अभिनेत्री साक्षी तन्वर पीएनजीचा प्रचार करताना दिसणार आहेत. या जाहिरातींमधून नैसर्गिक वायूची सुरक्षितता, परवडणारी किंमत, वापरण्यातील सोय आणि पर्यावरणपूरक फायदे अधोरेखित करण्यात आले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल
बीपीसीएलचे विपणन संचालक शुभंकर सेन यांनी सांगितले की, “पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह 2.0 हा राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. नैसर्गिक वायू स्वयंपाकघरापासून ते वाहतुकीपर्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड ऊर्जा पुरवतो, तसेच कार्बन उत्सर्जनात मोठी घट घडवून आणतो.”
‘नॉन-स्टॉप जिंदगी’ ही संकल्पना घरगुती, व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्रासाठी नैसर्गिक वायूला चिंता-मुक्त इंधन म्हणून सादर करते. पीएनजीमुळे सिलिंडर रिफिलची गरज संपते, तर सीएनजी स्वच्छ आणि कार्यक्षम मोबिलिटीला प्रोत्साहन देते.
बीपीसीएलचे व्यवसाय प्रमुख (वायू) राहुल टंडन यांनी हा उपक्रम सार्वजनिक व खासगी सीजीडी कंपन्यांमधील अखिल भारतीय सहकार्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. “नैसर्गिक वायू हा केवळ इंधन नसून जीवन सुलभ करणारा घटक आहे. 2070 पर्यंत नेट-झिरो उद्दिष्ट साध्य करण्यास हा उपक्रम मदत करेल,” असे त्यांनी नमूद केले.
Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार
महानगर गॅस लिमिटेडच्या महाव्यवस्थापिका नीरा अस्थाना फाटे यांनी सांगितले की, पीएनजी आणि सीएनजीमुळे स्वच्छ जीवनशैली आणि स्वच्छ वाहतूक शक्य होते. जनतेपर्यंत प्रभावी संवाद साधणे ही या मोहिमेची प्रमुख ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या दशकात भारतातील शहर वायू वितरण पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2014 मध्ये 25–30 भौगोलिक क्षेत्रांपुरते मर्यादित असलेले जाळे आता 307 क्षेत्रांपर्यंत विस्तारले आहे. 2034 पर्यंत 12.64 कोटी पीएनजी घरगुती जोडण्या आणि 18,336 सीएनजी स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या देशात 1.61 कोटी पीएनजी जोडण्या आणि 8,500 हून अधिक सीएनजी स्टेशन कार्यरत आहेत.
बीपीसीएलने स्पष्ट केले की, शहर वायू वितरण कंपन्यांच्या सहकार्याने पीएनजी व सीएनजीचा स्वीकार वाढवून भारतासाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जा भविष्यास चालना देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.






