वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अकोला : शहरातील दोन मुलींना उपचाराचे आमिष दाखवून अघोरी पूजेसाठी पातूर शिवारातील जांब येथील जंगलात नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशांचा पाऊस पाहण्यासाठी करावयाच्या अघोरी पूजेसाठी जांब येथील कथित महाराजाच्या जाळ्यात अडकल्याचा जबाब या दोन्ही मुलींनीच सोमवारी (दि.27) पोलिसांत दिला.
हेदेखील वाचा : Raj Thackeray : शरद पवारांच्या जिवावर मोठे झालेल्यांना ४२ जागा, अन् पवारांना दहाच? राज ठाकरेंचा सवाल
या प्रकरणातील कथित राजू महाराज यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला. मात्र, त्याने जबाबात काय माहिती दिली, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. अकोला शहराच्या एका गरीब कुटुंबातील एक मुलगी सहा महिन्यांपासून अर्धांग वायूने त्रस्त होती तर दुसरीला महिनाभरापासून रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यांच्या असहायतेचा फायदा घेत राजू अवचार उर्फ राजू महाराज आणि त्यांच्या अकोला व पातूर येथील साथीदारांनी त्या दोघींना अघोरी पूजेसाठी पातूरच्या जंगलातील शिवमंदिरात तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री नेले होते. तिथे राजू महाराज आणि कथित डॉक्टरांसह अघोरी प्रयोग सुरू होता. हा प्रयोग तांदूळ फेकून पैशांचा पाऊस पाडण्याचा होता, असे सांगितले जाते.
दरम्यान, कारंजा, पुसद, मेडशी, पातूर आणि अकोला वेधून कथित भक्त मंदिराकडे निघाले होते. सावखेड येथील ग्रामस्थांना त्यांचा संशय आला. तेव्हा त्यांनी गोधन चोरीचा समज करून टोळीच्या चारचाकी गाडीचा पाठलाग केला. यावेळी वेगाने चालवलेली गाडी अनियंत्रित होऊन खड्डयात कोसळली. वाहनातून उतरलेले तिघांपैकी दोघे महामार्गाच्या दिशेने पळून गेले, तर रहेमत खान हमीदखान (वय 45) हा जंगलाच्या दिशेने पळाला. तो खोल दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता.
राज्यात फसवणुकीचे वाढले प्रमाण
राज्यात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी तसेच इंजिनिअरींग व इतर महत्वाच्या शाखा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी पुण्यात सक्रिय असल्याचे दिसते. दरवर्षी प्रवेशाच्या निमित्ताने फसवणूक होते. परंतु, या टोळ्या मात्र समोर येत नसल्याचे दिसते.
हेदेखील वाचा : HSC SSC Exam: परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाने उचललं मोठं पाऊल