शारदीय नवरात्रीतला आजचा रंग म्हणजे राखाडी . खरंतर राखाडी रंग हा बुद्धीमत्ता आणिकुशलतेचं प्रतीक आहे. देवींच्या संदर्भात राखाडी रंगाचं विशेष असं महत्व आहे. खरंतर काळा किंवा रााखाडी रंंग याबाबत नकारात्मक मानसिकता जास्त पाहायला मिळते. मात्र याच राखाडी रंगाचा अर्थ आणि महत्व खूप मोठं आहे. देवी सरस्वती ही बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानली जाते. ती पांढरे वस्त्र परिधान करते. तशीच देवी कात्यायनी, स्कंदमाता आणि काळरात्री यांना देखील बुद्धीमता आणि साहसाचं प्रतीक म्हटलं जातं.
राखाडी रंग साहस आणि बुद्धीमत्ता दर्शवतो. या रंगाचं महत्व असं की, शांतता, सुशील आणि संयमी असण्याबरोबर एक स्त्री साहसी आणि बुद्धीवान हे दोन्ही पैलू तिच्यात असतात.
तटस्थता आणि संतुलन : राखाडी रंग काळा आणि पांढरा यांच्या मधला असल्यामुळे तो जीवनातील संतुलन, स्थिरता आणि समतोल यांचं प्रतीक आहे. नवरात्रीच्या दिवशी भक्तांनी मनातील नकारात्मकता, भीती किंवा द्वेष यांचा नाश करून आत्मिक संतुलन साधण्याचा संदेश दिला जातो.
नवदुर्गांपैकी सर्वात गूढ आणि प्रभावी स्वरूप असलेली ही देवी. तिच्या नावाचा अर्थच तिचं वैशिष्ट्य सांगतो. काळी रात्र, म्हणजेच अज्ञान, भीती आणि नकारात्मकतेचा पूर्ण अंत. या काळरात्री देवीला देखील निळा, काळा आणि राखाडी रंग प्रिय आहे. त्याचप्रमाणे देवी स्कंदमाता आणि देवी कात्यायनी या सहनशक्ती आणि स्वालंबाचं प्रतीक मानतात. नवरात्रीत राखाडी रंग प्रामुख्याने देवी स्कंदमाता किंवा काही परंपरांमध्ये काळरात्री देवीच्या पूजेशी जोडला जातो.आईच्या रूपातील देवी, जी संरक्षण, मातृत्व आणि ज्ञान देणारी आहे. राखाडी रंग तिच्या करुणा आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. तसंच अंधारावर विजय मिळवणारी आणि भय दूर करणारी शक्ती. राखाडी रंग अज्ञानाचा नाश आणि अंतरिक प्रकाशाचा मार्ग दाखवतो. नवरात्रीतील राखाडी रंग आपल्याला आत्मसंयम, स्थैर्य आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा संदेश देतो. अंधारात प्रकाश मिळवण्यासाठी तटस्थतेचा आणि शांततेचा मार्ग महत्त्वाचा आहे हेच हा सांगणारा हा रंग म्हणजे राखाडी रंग.
प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या दोन असुरांनी त्रैलोक्य जिंकून देवकुळाला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांचा सेनापती रक्तबीज याला एक विशेष वरदान प्राप्त होतं. त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडला तरी त्यातून आणखी असंख्य रक्तबीज जन्माला येत.देवी दुर्गेने जेव्हा रक्तबीजाशी युद्ध केलं तेव्हा त्याच्या रक्तामुळे हजारो असुर निर्माण होऊ लागले.या संकटाचा अंत करण्यासाठी देवीने आपलं भयंकर रूप धारण केलं. त्या रूपाला काळरात्री असं नाव पडलं.तिने रक्तबीजाचा वध करताना त्याचं रक्त जमिनीवर पडू नये म्हणून आपल्या जिभेने सर्व रक्त पिऊन टाकलं आणि असुरांचा संहार केला.काळरात्री ही दुष्ट शक्तींचा अधर्माचा संंपूर्ण नाश करून धर्माचं रक्षण करणारी शक्ती आहे.