चैतन्यनंद सरस्वतीपासून आसाराम बापू पर्यंत...; या बाबांवर लागलेत बलात्काराचे आरोप
Swami Chaitanyananda Saraswati: दिल्लीतील वसंत कुंज येथील एका प्रसिद्ध आश्रमाचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर १५ महिला विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर वसंत कुंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पण त्याचवेळी चैतन्यनंद सरस्वती सध्या फरार असल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या व्होल्वो कारवर बनावट नंबर प्लेट आढळली, जी जप्त करण्यात आली आहे. चैतन्यनंद सरस्वती हे पहिले बाबा नाहीत ज्यांच्यांवर महिलां अत्याचाराशी संबंधित गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही अनेक बाबा-बुवांवर महिलांशी छेडछाड आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहे. गेल्या काही वर्षांत, असंख्य प्रकरणे समोर आली आहेत ज्यात बाबांवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत.
‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार
देव असल्याचा दावा करणारा राम रहीम १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हरियाणातील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला त्याच्या आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर जवळजवळ एक दशकानंतर पीडित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचार आणि जबरदस्तीच्या भयानक कहाण्या सांगितल्या, त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आले.
आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. त्याच्यावर २०१३ मध्ये इतर पीडितांसह १६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. शिवाय, त्यांचा मुलगा नारायण साई याच्यावरही असेच आरोप आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचा हवाला देत, आसारामने अनेक जामीन अर्ज दाखल केले आहेत, परंतु न्यायालयाने ते वारंवार फेटाळले आहेत.
२०१० मध्ये, प्रसिद्ध दक्षिण भारतीय गुरु नित्यानंद यांची एमएमएस सीडी व्हायरल झाली. या सीडीमध्ये तो एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत दिसला होता. सीडीमध्ये छेडछाड असल्याचा दावा करूनही, त्याला ५२ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर, तो भारतातून पळून गेला आणि ‘कैलाश’ नावाचा स्वतःचा देश निर्माण करण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे.
India Rain Alert: अखेर पावसाने घेतला ब्रेक! वरूणराजा करणार आराम; ‘या’ राज्यांना सुट्टी नाही
स्वामी सद्चारी याला वेश्यालय चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नकारात्मक पैलू उघड झाला.
महाराज चित्रकूट वाले म्हणून ओळखले जाणारे स्वामी भीमानंद त्यांच्या सर्प नृत्यासाठी कुप्रसिद्ध होते. १९९७ मध्ये त्यांना सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्यावर आध्यात्मिक शिक्षणाच्या नावाखाली मुलींना लैंगिक तस्करीसाठी प्रलोभन देण्याचा आरोप होता.