आज पाऊस घेणार विश्रांती (फोटो- ani)
देशभरात आज पाऊस घेणार विश्रांती
महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात
उत्तर भारतात हवामान मोकळे राहण्याचा अंदाज
Weather Update: गेले काही दिवस देशभरात मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र अनेक राज्यात आज पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. तर काही राज्यांना पाऊस झोडपून काढत आहे. दिल्ली, उत्तराखंड राज्यांमध्ये हवामान मोकळे राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांमध्ये पाऊस होण्याचा अलर्ट दिला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.
राजधानी दिल्लीत आज हवामान मोकळे आहे. बऱ्यापैकी स्वच्छ हवा पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा शक्यता नाहीये. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. यमुना नदीची वाढलेली पाणी पातळी देखील कमी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेश राज्यात देखील आज पावसाचा शक्यता कमी आहे. मुसळधार पाऊस झाल्यावर खूप दिवसांनी मोकळे हवामान पाहायला मिळत आहे.
बिहारमध्ये कसे असणार हवामान?
आज दिवसभर बिहारमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. पटणा, भोजपुर, दरभांगा आणि अन्य जिल्ह्यात देखील आज हवामान स्वच्छ असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये देखील
कोलकात्यात मुसळधार पाऊस
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोलकाता आणि आसपासच्या भागात सोमवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
कोलकात्यात मुसळधार पाऊस; अनेक भागांत गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, रस्तेही पाण्याखाली, अलर्ट जारी
पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या या मुसळधार पावसात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. मुसळधार पावसात या चौघांनाही विजेचा धक्का बसला. आतापर्यंत मृतांपैकी तिघांची ओळख पटली आहे. यामध्ये बेनियाकपूर येथील फिरोज अली खान (वय ५०), नेताजी नगर येथील प्रांतोष कुंडू (वय ६२) आणि इक्बालपुल येथील मुमताज बीबी (वय ७०) यांचा समावेश आहे. ओळख पटलेली नसलेल्या आणखी एका व्यक्तीचा गरियाहट येथे मृत्यू झाला. कोलकाता पोलिसांनी सांगितले की, पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला हुसेन शाह रोडवर विजेचा धक्का बसला. त्याला एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.