शिक्रापुरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार; दहा गॅस सिलेंडरसह कार जप्त, दोघे अटकेत
शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावरून बेकायदेशीरपणे व धोकादायक पद्धतीने गॅस सिलेंडरची वाहतूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना दहा गॅस सिलेंडर व कारसह पोलिसांनी जेरबंद केले असून, अशोक दिलीप पवार व अनिल तुकाराम चव्हाण असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे.
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील चाकण चौक परिसरात पोलीस वाहतूक नियमन करत असताना अहिल्यानगर दिशेने एक कार बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानू बांगर, पोलीस हवालदार मिलिंद देवरे, ट्राफिक वार्डन अमोल राऊत, जिंदावली जमादार, किरण थोरात, अनिल वाडेकर, सुरेंद्र वाटोरे यांनी सदर ठिकाणी सापळा लावला असता अहिल्यानगर बाजूने कार आल्याचे दिसून आली.
पोलिसांनी सदर कारची तपासणी केली असता कारमध्ये एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या सात तर व्यावसायिक वापराच्या तीन गॅस सिलेंडर टाक्या दिसून आल्याने पोलिसांनी सदर कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तर गॅस सिलेंडरबाबत कोणत्याची पावत्या बिले नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी दोघांना कार व गॅस सिलेंडरसह ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस हवलदार मिलिंद दिलीप देवरे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अशोक दिलीप पवार (वय ३४ वर्षे रा. परडी माटेगाव ता. वडवणी जि. बीड) व अनिल तुकाराम चव्हाण (वय २१ वर्षे रा. जोगवाडा ता. जिंतूर जि. परभणी) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.
अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा
आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा थेट परिणाम इगतपुरीतील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायावर झाला आहे. इंधनाअभावी तालुक्यातील अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून, सुरू असलेल्या हॉटेल्सनी आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीत (मेनू) मोठी कपात केली आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून हॉटेल चालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील मानस लाइफस्टाइल रिसॉर्ट, नर्मदा हॉटेल, साई प्लाझा, फूड प्लाझा यांसारख्या मोठ्या आणि नामवंत हॉटेल्समध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.
MSEDCL Smart Meter: नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू






