अखेर निलेश घायवळचं लंडनमधील लोकेशन सापडलं; पुणे पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती
टिटवाळ्यात एका संतापजनक घटना समोर आली आहे. गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या वादातून सोनाराची अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी सोनाराकडून २ लाख रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास दरीत फेकून मारण्याची धमकी दिली. सोनाराने टिटवाळा पोलिसात धाव घेतली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार टिटवाळ्यातील खडवली येथे सोनार उगम चौधरी यांच्या सोबत घडला आहे.
पैसे दे नाहीतर दरीत फेकेन
मिळालेल्या माहितीनुसार, उगम याचे खडवली येथे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. एका महिलेने चार वर्षांपूर्वी उगम याच्याकडे दागिने गहाण ठेवले आणि काही पैसे घेतले होते . चार वर्षानंतर ही महिला उगमकडे दागिने मागण्यासाठी आली. त्यावेळी उगमने त्यांना सांगितलं की जे पैसे बाकी आहेत ते द्या, मी दोन दिवसात तुमचे दागिने देतो. त्यानंतर ती महिला तेथून निघून गेली, पण काही वेळाने उगमला संजय पाटोळे यांचा फोन आला. त्यानंतर संजय आपल्या दोन साथीदारांसोबत उगमच्या दुकानात आले. त्यांनी उगमला बाहेर बोलवलं आणि आपल्या गाडीत बसवून खडवली पोलीस चौकी पासून काही अंतरावर नेलं, तिथे त्याला बेदम मारहाण केली. तसेच (त्या महिलेचे) दागिने फुकट दे आणि अजून दोन लाख रुपये दे अन्यथा तुला मारून दरीत फेकून देईल अशी धमकी दिली. यामुळे तो सोनार प्रचंड घाबरला आणि त्याने टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत घाटीत सर्व प्रकार सांगितला. त्याची नोंद घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे खडवली परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे.
धक्कादायक! मैत्रिणीशी भांडण झालं, रागाच्या भरात १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला जाळलं
ठाणे: ठाण्यातून एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनने ठाणे शहर हादरून गेला आहे. एका १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे तिला पेटवून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणात १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
वेळेत तक्रार दिल्यास फसवणूक झालेली रक्कम मिळू शकते परत; ‘इथं’ प्रत्यक्ष आला अनुभव






