महाभारतामध्ये पांडव आणि कौरवांमध्ये झालेल्या युद्धाची गाथा सांगण्यात आली आहे, हे इतिहासातील सर्वात मोठं युद्ध म्हणून ओळखलं जात. महाभारताची ही कथा आपण अनेक ग्रथांंमध्ये वाचली किंवा चित्रपटांमध्ये पाहिली असेल. ही कथा आपल्याला फक्त युद्धाचे वास्तव समजून सांगत नाही तर धर्म, कर्म आणि त्यागाची गाथा आपल्या डोळ्यासमोर आणते. महाभारत युद्धामध्ये अनेक अष्टपैलू योद्धांनी आपले प्राण गमावले, पण या योद्धांच्या शेवटच्या इच्छा काय होत्या ते तुम्हाला माहिती आहे का?
महाभारतातील या योद्धांनी मृत्यूवेळी अशी अनोखी गोष्ट मागितली... वाचून तुम्हीही व्हाल दंग

महाभारतात असे अनेक योद्धा होते जे आपल्या शक्तीसोबतच आपल्या विनम्रतेसाठीही ओळखले गेले. भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य शक्तीने त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या.

आपल्या उदारतेमुळे ओळखला जाणारा कर्ण याने आपले सर्वस्व युद्धात अर्पण केले. भगवान श्रीकृष्णाने त्याच्या मृत्यूपूर्वी एक वरदान दिले. कर्णाने पुढच्या जन्मी श्रीकृष्णाच्या राज्यात जन्म घेण्याची विनंती मृत्यूपूर्वी केली.

उदार कर्णाची अशी इच्छा होती की, त्याचे अंतिम संस्कार अशा ठिकाणी व्हावेत जिथे कधीही कोणते पाप झाले नाही. भगवान श्रीकृष्णाने त्याची ही इच्छा पूर्ण केली ज्यानंतर कर्णाला मोक्ष मिळाला आणि तो वैकुंठाला परतला.

महाभारतातील सर्वात बुद्धिमानी योद्धा म्हणून विदूर प्रसिद्ध होता, त्याच्या शेवटच्या इच्छेत त्याने सांगितले की, मृत्यूनंतर त्याचे शरीर सुदर्शन चक्रात विलीन व्हावे. भगवान श्रीकृष्णाने त्याची ही इच्छा पूर्ण केली होती

भीमाचा पराक्रमी मुलगा घटोत्कच याला जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपली शेवटची इच्छा विचारली तेव्हा त्याने त्याचे शरीर जाळू किंवा दफन करु नये असे म्हटले. याउलट त्याचे संपूर्ण शरीर हवेत विरघळून जावे अशी इच्छा त्याने मागीतली.






