उरलेल्या भातापासून काय बनवावे सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मऊ- जाळीदार उत्तपा
जेवणाच्या ताटात भात हा पदार्थ कायमच असतो. भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. पुलावभात, बिर्याणी, वरण भात, फोडणीचा भात इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ भातापासून बनवले जातात. पण काहीवेळा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवलेला भात शिल्लक राहतो. मग उरलेल्या भाताचे नेमकं काय करावं? असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात किंवा मसाले भात बनवला जातो. पण नेहमीच फोडणी भात खाऊन कंटाळा येतो. याशिवाय फोडणीच्या भातामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उरलेल्या भातापासून मऊ- जाळीदार उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उत्तपा हा पदार्थ तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता. याशिवाय उत्तपा बनवण्यासाठी बाहेरून विकत पीठ आणले जाते. पण विकतच्या पिठाचे उत्तपा बनवण्यापेक्षा उरलेल्या भातापासून उत्तपा बनवावा. चला तर जाणून घेऊया उरलेल्या भातापासून उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश
झणझणीत पदार्थांची आवड आहे? मग घरी बनवा विदर्भ स्टाईल ‘पाटवडी रस्सा’; यापुढे चिकन रस्साही पडेल फिका






