प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटनांमध्ये (Rape Cases) दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घटना घडवून आणण्यासाठी लोक वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राममधील (Gurugram in Haryana) एका हॉटेलमध्ये (Hotel) १६ वर्षीय तरुणीवर कथित बलात्कार (Alleged Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीचा कट जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
खरं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेच्या आईने आरोप केला आहे की तिच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने इंस्टाग्रामवर उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीशी मैत्री केली. संभाषणानंतर आरोपीने पीडितेला गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. पीडितेचा आरोप आहे की, त्या व्यक्तीने तिच्या मुलीला गेल्या आठवड्यात सुमारे दोनदा हॉटेलमध्ये बोलावले.
[read_also content=”बेपत्ता ५ वर्षीय सिम्मीची हत्या, मारेकऱ्याने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर कान कापले; वाचा या क्रूरकर्म्यानं असं का केलं https://www.navarashtra.com/crime/unnao-crime-5-year-old-missing-girl-dead-body-found-in-bushes-outside-her-kushalpura-village-nrvb-366767.html”]
जिथे त्याने तरुणीवर बलात्कार केला आणि तिचे अश्लील व्हिडिओ तसेच फोटो ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी देऊन तिला भेटण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. आश्चर्यकारक बाब म्हणजे मुलीचे अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आरोपीने ते मुलीच्या आईलाही पाठवले. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, आता आरोपींवर POCSO कायद्यासह अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[read_also content=”ही महिला करते बिकिनी घालून शेती, सोशल मीडियावर झाली ट्रोल, आता दिलंय सडेतोड उत्तर https://www.navarashtra.com/viral/woman-farmer-does-farming-in-bikini-trolled-on-social-media-now-gave-such-a-befitting-reply-viral-on-social-media-nrvb-366727.html”]