Photo Credit- Social Media Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी; न्यायालयात नेमक कायं घडलं, उज्वल निकमांनी संगळंच सांगितलं
बीड: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज केज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपला युक्तिवाद करत संतोष देशमुखांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. याचवेळी त्यांनी त्यांच्या हत्याकांडाच्या मास्टरमाइंडची माहिती उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मांडली. तसेच, आरोपींच्या वकिलांना संबंधित सर्व कागदपत्रे सोपवण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादानंतर आरोपींच्या वकिलांनी आपली बाजू मांडली.
बीड जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. वाल्मिक कराडपासून या प्रकऱणातील आरोपींनाव्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बोलताना उज्वल निकम म्हणाले की, या प्रकरणातील गँग लीडर सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडने मार्गदर्शन केले असून, ही माहिती सीडीआर अहवालातून समोर आली आहे. 8 डिसेंबर 2024 रोजी नांदूर फाटा येथील हॉटेलमध्ये तिरंगा येथे वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक पार पडली. संपूर्ण कट रचण्यामध्ये वाल्मिक कराडने महत्त्वाची भूमिका बजावली. या बैठकीला लीडर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि इतर आरोपी उपस्थित होते. वाल्मिक कराडनेच या बैठकीत संतोष देशमुख यांना धडा शिकवण्याची चर्चा केली.
Maharashtra Weather: ‘या’ जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; उन्हाच्या कडाक्याने महाराष्ट्र होरपळला
फरार आरोपी कृष्णा आंधळेने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना फोन केल्याचेही निकम यांनी सांगितले केला होता. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्रे आणि आवश्यक साहित्य पुरवण्यात आले. आरोपी कृष्णा आंधळेने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना तीन वेळा फोन केल्याचेही सीडीआरमधून स्पष्ट झाले आहे. तसेच, सुरुवातीला आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन घुलेने मारहाण केल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केले.
महत्त्वाचे जे साक्षीदार आहेत त्यांची ओळख गोपनीय ठेवावी अशी आम्ही न्यायालयाकडे विनंती केली आहे. तसेच, या आरोपींची जी मालमत्ता जप्त करण्याची विनंती आम्ही न्यायालयाकडे केली आहे. सीआयडी, एसआयटीचे प्रमुख, त्यांचे सहकारीदेखील न्यायालयात हजर होते. आरोपींनाही त्यांना लागणाऱ्या आरोपांची पूर्तता केली आहे. आमच्याकडील उपलब्ध पुरावे आम्ही न्यायालयात सादर केली आहे. तसेच 8 ऑक्टोबर 2024 पासू संतोष देशमुख यांची हत्या झाली तो दिवस 9 डिसेंबर 2024 पर्यंतचा सर्व घटनाक्रम आम्ही न्यायालयात विषद केली आहे. प्रत्येक घटनेच्या तारखेचा आमच्याकडे पुरावा आहे.
Eknath Khadse : एकनाथ खडसे विधीमंडळातील कारभारावरुन कडाडले….; शंभूराज देसाईंवर साधला निशाणा
बीडमधील संघटित गुन्हेगारी कशी फोफावली गेली, सुदर्शन घुले मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हेही न्यायालयात सांगितले आहे. आरोपींच्या वकीलांना कागदपत्रे देण्यात आली आहेत. 10 एप्रिलाला पुढील सुनावणी होणार आहे. त्या दिवशी आरोपींवर कोणकोणते गुन्हे दाखल करावेत हे आम्ही न्यायालयात मांडणार आहोत.