राजधानी दिल्लीतील (Delhi) आरके पुरम भागात (R K Puram) ७ वर्षांच्या मुलीच्या (7 Years Old) आईने (Mother) तिच्याशी असे क्रूर कृत्य केले की काळजातही धस्स झालं. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीला काल रात्री रुरकी येथून अटक केली आहे. दोघांनाही दिल्लीत आणण्यात आले आहे. या महिलेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत घेण्याची तयारी सुरू आहे.
या प्रकरणात पोलीस महिलेच्या पतीच्या भूमिकेचाही तपास करत आहेत. महिलेने मूल दत्तक घेतले होते, मग तिला निर्दयीपणे आणि बेदम मारहाण का केली, याचाही शोध पोलिस घेत आहेत. मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या २५ वर्षीय मुलाला यापूर्वीच अटक केली आहे.
आरोपी महिला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नर्स असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला आणि तिच्या मुलाने सर्व मर्यादा ओलांडल्या, मुलीला गरम चिमट्याने चटके दिले, चिमच्यात जळता कोळसाही टाकला आणि तिला गरम तव्यावर बसवून तिच्यावर अत्याचार केले, तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत केल्याचा आरोप आहे.
नर्सच्या मुलाने मुलीला अनेक तास पंख्याला लटकवून ठेवले, असाही आरोप आहे. कडाक्याच्या थंडीत मुलीला कपड्यांशिवाय बाल्कनीत बसायला लावले. हा सर्व प्रकार मुलीला सहन न झाल्याने तिने सर्व प्रकार शाळेतील शिक्षकांना सांगितला. यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
आरके पुरम पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी परिचारिकेच्या मुलाला अटक केली, तर आरोपी परिचारिका फरार होती. आता पोलिसांनी तिलाही काल रात्री अटक केली आहे.
[read_also content=”अजब फॅशनची गजब तऱ्हा, माणसाची केली हँडबॅग; बघून लोकं झाले अवाक् आणि सोशल मीडियावर झाला कल्ला https://www.navarashtra.com/viral/bizarre-fashion-body-bag-people-were-blown-away-by-the-sight-viral-on-social-media-nrvb-370540.html”]
दक्षिण-पश्चिम जिल्ह्याचे डीसीपी मनोज सी यांनी सांगितले की, आरके पुरम पोलिसांना ९ फेब्रुवारी रोजी मुलीकडून क्रूरतेची तक्रार मिळाली होती. पोलिसांनी पाहिले असता मुलीच्या अंगावर भाजलेल्या व जखमेच्या खुणा होत्या. तपासादरम्यान आरोपीने काही वर्षांपूर्वी मुलीला दत्तक घेतल्याचे निष्पन्न झाले.
आरके पुरम येथील शाळेत ही मुलगी पहिल्या वर्गात शिकते. मुलगी वेदनेने ओरडू लागली, तेव्हा मी तिला विचारले, तेव्हा तिने शिक्षकांना घटनेची माहिती दिली. शिक्षकाने बालकल्याण समिती आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली.