मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पॉर्न रॅकेट प्रकरणात कुंद्राविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Raj Kundra Pornography Case).
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या वर्षी 20 जुलै रोजी राज कुंद्राला पॉर्न रॅकेटप्रकरणी अटक केली होती. सध्या कुंद्रा जामिनावर बाहेर आहे. कुंद्रावर ‘हॉटशॉट्स’ नावाच्या अॅपद्वारे अश्लील चित्रपट शेअर केल्याचा आरोप आहे. कुंद्राला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता.
आता मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज कुंद्रासह शिल्पा शेट्टीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. राज कुंद्राच्या कंपनीला 13 वेगवेगळ्या खात्यांमधून पैसे पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. हा पॉर्न चित्रपटातून कमावलेला पैसा असल्याचा आरोप इडीने केला आहे.
ईडीच्या तपासानुसार, फेब्रुवारी 2019 मध्ये राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती आणि हॉटशॉट्स नावाचे अॅप विकसित केले होते. हे Hotshots अॅप राज कुंद्राने केनरिन नावाच्या ब्रिटीश कंपनीला 25 हजार डॉलरमध्ये विकले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्याची कंपनी विआन यांच्याशी संबंधित सर्व 13 बँक खात्यांमध्ये पॉर्न चित्रपटांमधून आलेली मोठी कमाई वळवली जात होती. त्यानंतर हे पैसे काही शेल कंपन्यांमध्ये वळवले जायचे आणि शेवटी हे पैसे राज कुंद्राच्या वैयक्तिक बँक खात्यात यायचे.
या कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे भाऊजी आहेत. हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी राज कुंद्राची कंपनी विहानने केनरिन कंपनीशी करार केला होता. त्यामुळे या देखभालीसाठी विहान कंपनीच्या 13 बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाले. हे मनी लॉड्रिंगच असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]