फोटो सौजन्य: Gemini
बेपत्ता झालेल्यांमध्ये मुकीद अहमद शेख (वय ३५) आणि निलोफर मुकीद शेख (वय ३०), रा. कोरडगाव (ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे. त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेले रावसाहेब खडेकर (रा. चांगतपुरी) हे देखील बेपत्ता असल्याची माहिती आहे.
या अपघातात कार चालक अल्ताफ पठाण यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ कारमधून बाहेर पडल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र कारमधील शेख दाम्पत्य आणि त्यांना मदत करण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला तरुण कालव्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख दाम्पत्य कार (क्र. एमएच १२ केजे ९०३२)ने पिंपळवाडीच्या दिशेने जात होते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास चांगतपुरी येथील चांगदेव विद्यालयाजवळ चालकाकडून रस्ता चुकला. अंधार आणि गोंधळाच्या परिस्थितीत कार मागे घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खोल कालव्यात कोसळले.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?
सध्या Jayakwadi Dam येथून कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने प्रवाह अत्यंत वेगवान असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. मात्र बेपत्ता तिघांचा शोध रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेची वार्ता समजताच कोरडगाव व परिसरावर शोककळा पसरली असून, संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.






