पती आहे की हैवान ? पत्नीला बाईकला बांधून फरफटत नेले, पत्नी ओरडत राहिली पण..., कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का (फोटो सौजन्य-ट्विटर)
राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील खिनवसार येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका माणसाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून या व्यक्तीने स्वत:च्या पत्नीला दुचाकीच्या मागे दोरीने बांधून संपूर्ण गावात फरफटत खेचल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून, पती आपल्या पत्नी सोबत असा कसा वागू शकतो? कोणत्याही महिलेसोबत असे वागण्याचा विचार तरी कसा करू शकतो का, याची कल्पना करणेही कठीण आहे.
व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही घटना नागौर जिल्ह्यातील खिनवसार उपविभागातील पचौरी गावात घडली आहे. तो महिलेला रस्त्यावर ओढत राहिला, पण मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. सगळे प्रेक्षक म्हणून बघत राहिले.
हे सुद्धा वाचा: सहारनपूरच्या सहकारी व्यापारी कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पसार, सौरभच्या प्रकरणाला येणार नवं वळण ?
लोक व्हिडिओ बनवत राहिले पण कोणीही त्याला मदत करू शकले नाही. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पती एवढा क्रूर असू शकतो का की स्वतःच्या पत्नीला जाहीरपणे लाजवेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा भयानक व्हिडिओ समोर आल्यानंतर या पवित्र नात्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमराम मेघवाल असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या लग्नाला फक्त 10 महिने झाले आहेत, मात्र तो पत्नीला सतत मारहाण करत आहे.
हे सुद्धा वाचा : सणसवाडीत मेहुण्यांनी पाडला दाजीचा दात; लोखंडी गजानेही केली मारहाण
पत्नीने महिनाभरापूर्वी बारमेर येथे बहिणीच्या घरी जाण्याचा हट्ट धरला होता. पतीच्या नकारानंतरही ती गेली. यामुळे तो इतका संतापला की त्याने पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. आश्चर्याची बाब म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी या घटनेचा निषेधही केला नाही. उलट त्याने एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ 1 महिन्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी प्रेमराम हा अंमली पदार्थांच्या सवयीचा बळी असल्याचे सांगण्यात येत आहे.