सौजन्य : iStock
शिक्रापूर : सणसवाडी (ता.शिरुर) येथे पत्नीला भेटण्यासाठी सासरी जाणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या तिघा मेहुण्यांनी बेदम मारहाण करत दात पाडल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राधे डीपीशन काळे, गुट्टन डीपीशन काळे, बहाद्दूर डीपीशन काळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार; शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचा अन्…
सणसवाडी (ता.शिरुर) येथील अरेश भोसले याची पत्नी विश्रांतवाडी येथे माहेरी गेली आहे. त्यामुळे अरेश त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सासरी गेला होता. त्यानंतर अरेश घरी असताना त्याचे तिघे मेहुणे अरेशकडे आले. त्यांनी अरेशला आमच्या घरी कशाला येतो? असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली. यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये अरेशचा दात पडला. यामध्ये तो बेशुद्धही झाला. दरम्यान, मारहाण करणारे तिघे पळून गेले.
याबाबत अरेश दादू भोसले (वय ३०, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राधे डीपीशन काळे, गुट्टन डीपीशन काळे, बहाद्दूर डीपीशन काळे (तिघे रा. विश्रांतवाडी ता. हवेली जि. पुणे) या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता सणसवाडीत मेहुण्यांनी दाजीचा दात पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा…,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या ‘निर्भया’ हत्येचे गुढ असे उकलले