Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तिघांची फसवणूक; तब्बल 55 लाखांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत तिघांची ५५ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडीत एक आणि वाघोली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2025 | 04:55 PM
चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तिघांची फसवणूक; तब्बल 55 लाखांना घातला गंडा

चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तिघांची फसवणूक; तब्बल 55 लाखांना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत तिघांची ५५ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडीत एक आणि वाघोली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एका ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्या व्यक्तीची ३२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कर्वेनगर परिसरात राहतात. ते नोकरी करतात. त्यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती देणारा मेसेज टाकला. त्यांनी मॅसेज पाहून त्यातील लिंक ओपन केली. तेव्हा सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी चॅट करत गुंतवणुकीचे आमिष दाखवले. चांगली रक्कम मिळेल असेही सांगितले. तक्रारदारांनी काही रक्कम गुंतवली. त्यावर सायबर चोरट्यांनी परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादित केला. नंतर तक्रारदाराला अधिकाधिक रक्कम गुंतवण्यास सांगितले. तक्रारदाराने ३२ लाख ९० हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडे अधिक पैशांची मागणी केली. तसेच, परतावा देणेही बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

अशाचं पद्धतीने वाघोली परिसरात देखील दोन व्यक्तींना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. त्यात ३६ वर्षीय नोकरदाराची १२ लाख ८४ हजार रुपयांची आणि अन्य एकाची नऊ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दोघांना देखील शेअर बाजारात गुंतवणूक करायला सांगून परतावा आणि मुद्दल परत केली नाही.

हे सुद्धा वाचा : गृहराज्यमंत्री कदमांच्या वक्तव्यावरुन प्रदेशाध्यक्ष सपकाळ संतापले; मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची केली मागणी

कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा

कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

निधी देण्याचे आमिष दाखवून सरपंचाची फसवणूक

गेल्या काही दिवसाखाली शिरुर तालुक्यातील एक सरपंच तसेच एका सामाजिक कार्यकर्त्याला एका बंटी बबलीने आम्ही स्वच्छ भारत अभियान विभागात कामाला असून, आमदार खासदारांसोबत ओळख असल्याचे दाखवून गावच्या विकास कामांना निधी देण्याचे आमिष दाखवत तब्बल सत्तावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरुर पोलीस येथे येथे सुदर्शन म्हाळू उगले व सारिका सुदर्शन उगले या बंटी बबलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: It has come to light that the three were cheated by the lure of good returns nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 04:55 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • cyber crime
  • Froud
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
1

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
2

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
3

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
4

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.