काय नेमकं घडलं?
श्रीकृष्ण-रुक्मिणी नगर परिसरातून निलेश अशोक अग्रवाल हे रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या स्कुटीवरून घरी जात होते. यावेळी चार तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांना वाटेत अडवले. आरोपींनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. यात अग्रवाल यांच्या नाकाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. चोरांनी त्यांच्याकडील १२ हजार रुपयांची रोकड हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.
तरुणांनी लूटमार केल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन मद्यप्राशन आणि जेवणाची जंगी पार्टी केली. अशोक अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला तेव्हा बाळा जगन्नाथ पिंपराळे, दिपक भगवान निर्मल, विशाल धुराजी हिवाळे आणि त्यांच्या एका साथीदाराची माहिती समोर आली.
गुन्हा कबुल
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. तरुणांमधून एका १९ वर्षीय तरुणाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे हवे होते म्हणून त्यांनी ही लूटमार केल्याची कबुली दिली. चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
जळगावमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला, आरोपी नागरिकांच्या मदतीने ताब्यात
जळगाव येथून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सिनेस्टाइल पाठलाग करून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या छातीवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. यात तरुण गंभीर झखमी झाला. साई बोराडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गोलाणी मार्केटमध्ये घडली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने संशयितांना नागरिकांनी पकडून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित आरोपीचे नाव शुभम सोनवणे असे आहे. जळगाव महापालीकेत उमेदवारांना अर्जाची छाननी सुरु असतांना बाजूच्या मार्केटमध्ये हल्ला झाल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाली होते.
Ans: वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी पैसे मिळवणे.
Ans: लुटीत किती रक्कम हिसकावली गेली?
Ans: पोलिसांनी काही तासांतच चौघांना अटक केली असून तपास सुरू आहे.






