कल्याण : मेल एक्स्प्रेस मधून प्रवास करताना (Travelling by Mail Express) मोबाईलवर (Mobile) बोलत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरून (Mobile Theft) पळून जाणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करत प्रवाशाने त्याला पकडले. मात्र चोरट्याने दिलेल्या धक्क्यामुळे प्रवाशाच्या चेहऱ्याला मार लागला मात्र तरी ही त्याने चोरट्याला सोडले नाही, अखेर कल्याण स्थानकात (Kalyan Railway Station) गाडी थांबताच हा चोरटा लोकलच्या दुसऱ्या बाजूने उतरून पळून जाऊ लागताच प्रवाशाने जीवाची पर्वा न करता या चोरट्याच्या मागोमाग गाडीतून उडी मारत त्याला पकडले आणि चोर चोर असा आरडा ओरडा करताच ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या (RPF) जवानांनी या चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी या चोरट्याकडून प्रवाशाचा मोबाईल हस्तगत करत त्याला अटक (Arrest) केली आहे, महेंद्र धूळधुळे २३ असे या चोरट्याचे नाव आहे.
[read_also content=”केडीएमसीच्या नगररचना विभागाची उल्लेखनीय कामगिरी, पालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना शहराबद्दल आत्मीयता https://www.navarashtra.com/maharashtra/remarkable-achievement-of-town-planning-department-of-kdmc-nrvb-393123.html”]
अनिरुद्ध शर्मा हे उत्तर प्रदेशहून येणाऱ्या राजेंद्र प्रसाद पटना एक्स्प्रेसने २७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता मुंबईकडे निघाले होते, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही गाडी कल्याण स्टेशन जवळ येत असताना शर्मा आपल्या जागेवर बसून मोबाईलवर बोलत होते. त्यांच्या समोरच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने संधी साधत त्यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला, मात्र शर्मा यांनी त्या चोरट्याला झडप टाकत पकडले. चोरट्याने त्यांना धक्का दिल्याने ते रॉडर आदळत जखमी झाले मात्र तरीही त्यांनी चोरट्याला सोडले नाही. अखेर गाडी कल्याण स्थानकात थांबताच त्याने गाडीच्या दुसऱ्या बाजूने उडी मारत पळण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही शर्मा याने त्यांच्या मागे उडी मारत त्याला पकडले.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 29 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-29-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
याचवेळी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी तातडीने धाव घेत त्याला ताब्यात घेत पोलिसाच्या हवाली केले. महेंद्र धूळधुळे हा चोरटा ठाणे घोडबंदर परिसरातील रहिवासी असून तो चालक म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले, पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत याचा तपास कल्याण पोलिसांकडून सुरु आहे.