केरळमधील (Kerala) त्रिशूर जिल्ह्यातील (Thrissur District) तिरुविल्वमला (Thiruvilvamala) येथे मोबाईल फोनचा स्फोट (Mobile Blast) होऊन 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला (8 Year Old Girl Dead). ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली, पोलिसांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. पोलिस फॉरेन्सिक टीम आणि तज्ज्ञांसोबत या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी ब्लॉक पंचायत सदस्य अशोक कुमार यांची मुलगी आदित्यश्रीने मोबाईल चेहऱ्याजवळ ठेवला होता. त्यानंतर त्यात स्फोट झाला. ती तिसरीत शिकत होती.
[read_also content=”खाकीनेच खाकीचा केला घात! पोलिसाकडूनच महिला पोलिसाचा विनयभंग, पोलीस हवालदार राजू पाटील याचे कृत्य; वाचा कुठं आणि कशी घडलीये घटना https://www.navarashtra.com/crime/khaki-attacked-khaki-pen-crime-news-pc-raju-patils-act-of-molesting-a-policewoman-by-police-itself-nrvb-391531.html”]
पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगी बराच वेळ व्हिडिओ पाहत होती, अशा स्थितीत बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी मोबाईल खरेदी केला होता. गेल्या वर्षी त्याची बॅटरी बदलण्यात आली होती. स्फोट इतका जोरदार होता की मुलीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली, तिच्या उजव्या हाताची बोटे तुटली आणि तिचा तळहात जळाला. तिचा जागीच मृत्यू झाला.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 25 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-25-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]