Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी; कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास

Navi Mumbai Crime Marathi : वनमंत्री गणेश नाईक यांचे निवासस्थान असलेल्या कोपरखैरणे सेक्टर 11 मधील बालाजी गार्डन सोसायटीत घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने एका घरातून सोन्याचे दागिने आणि रोकडसह तब्बल 8.82 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असून, सोसायटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 25, 2026 | 04:59 PM
वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी; कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास

वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी; कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास

Follow Us
Follow Us:
  • वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोसायटीत घरफोडी
  • कोपरखैरणेत 8.82 लाखांचा ऐवज लंपास
  • बालाजी गार्डन सोसायटीत चोरीची घटना
सावन वैश्य, नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर ११ मधील बालाजी गार्डन या सोसायटीत घरफोडीची घटना घडली आहे. या घरफोडीत चोरट्याने जवळपास पावणे नऊ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे निवासस्थान या सोसायटीत असल्याने, या सोसायटीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह आता उपस्थित केले जात आहे.

Thane Crime: ठाणे पोलिसांचा मोठा पर्दाफाश; ‘तेल माफिया’ राजू पंडितवर डिझेल चोरी रॅकेटचा गुन्हा

वनमंत्री गणेश नाईक यांचे निवासस्थान असलेल्या बालाजी सोसायटीत घरफोडीची घटना घडली आहे. फिर्यादी या कोपरखैरणेतील बालाजी सोसायटीत, डी २०३ मध्ये राहतात. फिर्यादी हे दिनांक 26 एप्रिल रोजी घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. त्यादरम्यान फिर्यादी यांच्या बेडरूम मधील लॉक नसलेल्या कपाटातून 1 सोन्याची चैन, 4 जोड सोन्याचे टॉप्स, 1 जोड सोन्याची बाली, 2 नाकातील सोन्याची नथ, 5 सोन्याच्या अंगठ्या, 1 नाकातील सोन्याचे स्टड, व 17 हजार रुपयांची रोकड, असा एकूण 8 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. दिनांक 23 मे रोजी फिर्यादी या घरी परत आल्यावर त्यांना कपाटातील दागिने आढळून न आल्याने, घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

कोपरखैरणे सेक्टर 11 मधील बालाजी गार्डनमध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे देखील निवासस्थान आहे. त्यामुळे खुद्द वनमंत्री राहत असलेल्या सोसायटीत लाखो रुपयांची घरफोडी झाल्याने, तेथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिथे वनमंत्र्यांच्या सोसायटी चोऱ्या होत असतील, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न देखील नवी मुंबईतील नागरिक आता उपस्थित करत आहेत. त्यामुळे या चोरट्याला कोपरखैरणे पोलीस किती दिवसात पकडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

३८ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू

सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी बेलापूरजवळ शनिवारी संध्याकाळी एक भीषण ‘हिट अँड रन’ची घटना घडली. एका अज्ञात भरधाव वाहनाने मागून स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर जखमी चालकाला कोणतीही मदत न करता आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात ३८ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू झाला आहे.

Rajasthan Crime: प्रेमसंबंधांच्या संशयातून राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूची निर्घृण हत्या, कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या

Web Title: Koparkhairane balaji garden society theft near ganesh naik residence 882 lakh stolen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumabi News: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे? पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्न
1

Navi Mumabi News: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे? पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्न

CIDCO Encroachment in Ghansoli : घणसोलीत सिडकोच्या भूखंडांवर बिल्डर्सची अनधिकृत कार्यालये
2

CIDCO Encroachment in Ghansoli : घणसोलीत सिडकोच्या भूखंडांवर बिल्डर्सची अनधिकृत कार्यालये

Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द, गाडेंची चौकशी होणार
3

Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द, गाडेंची चौकशी होणार

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.