(फोटो सौजन्य: Pinterest)
पतीने पत्नीला मुंबईला नेले नाही, ही त्याचीच चूक
पतीने याचिकेत म्हटले होते की, नोकरीसाठी तो तमिळनाडूतील शिवगंगाहून मुंबईला गेला; मात्र पत्नी त्याच्यासोबत आली नाही. २०१४ मध्ये त्याने शिवगंगा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. त्याने पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही केला. सप्टेंबर २०२१ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली. पती स्वतः नोकरीसाठी मुंबईला गेला आणि त्याने पत्नीला सोबत नेले नाही. त्यामुळे स्वतःच्या चुकीचा फायदा घेत पती घटस्फोट मागू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे






