फोटो सौजन्य- pinterest
बुध ग्रह गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.8 वाजता विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. पंचांगानुसार, वाणी, व्यापार आणि संवादाचा ग्रह बुध सध्या स्वाती नक्षत्रात संक्रमण करणार आहे. बुध ग्रह या नक्षत्रातून निघून 27 ऑक्टोबरपर्यंत विशाखा नक्षत्रात राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, विशाखा नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये बुध ग्रह आहे. या नक्षत्रात बुधाच्या संक्रमणाचा विशेष प्रभाव पडताना दिसून येईल. बुध ग्रहांचे होणारे हे नक्षत्र संक्रमण काही राशीच्या लोकांना करिअर, नोकरी आणि व्यवसायासह विविध क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
बुध ग्रहाचे मिथुन राशीच्या लोकांवर होणारे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण, लेखन, विपणन आणि मीडिया क्षेत्रांशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि संवाद कौशल्याचा पूर्ण फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला परदेशातून काम किंवा प्रकल्प मिळू शकेल.
बुध ग्रहाचे कन्या राशीच्या लोकांवर होणारे संक्रमण तुमच्या व्यावसायिक जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होणारा राहील. तुम्ही बऱ्याच काळापासून करत असलेले कोणतेही प्रयत्न या काळात यशस्वी होतील. भागीदारीमध्ये गुंतवणूक आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे बोलणे सुधारेल आणि तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक होईल. तसेच या काळात प्रलंबित कामे पूर्ण होतील. त्यासोबतच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला संवाद, नेटवर्किंग आणि धोरणात्मक नियोजन या क्षेत्रात विशेष यश मिळेल. विक्री, जनसंपर्क, शिक्षण किंवा समुपदेशन या क्षेत्रात गुंतलेल्यांना प्रचंड फायदा होऊ शकतो. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. या काळात करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तसेच नोकरीमध्ये पदोन्नती आणि बढतीची नवीन संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)