Pune Crime News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं...
शफिया शेख यांचा मृतदेह १० फेब्रुवारी रोजी मांगडेवाडी परिसरातील एका क्रशर खाणीत आढळून आला होता. संशयास्पद रित्या मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले.
Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपंडाव; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफिया शेख ही महिला वेश्याव्यवसाय करायची. ८ फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होत्या. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (२०), सोन्या लक्ष्मण पवार (१८) आणि अब्दुल मोहम्मद शेख (२३) यांनी त्यांना पाहिले. तिघांनी शफिया यांना कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचं ठरवले. मात्र लॉजवर न नेता त्यांना मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (४०), साई अमित पुजारी (१९) आणि सोहेल हनीफ खान (२०) तेथे पोहोचले.
मृत शाफिया आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना शफिया यांनी आपल्याला लॉजवर न नेता डोंगरावर का आणले, असा सवाल करत आरोपींसोबत वाद घातला.वाद वाढल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात शफिया यांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे ५० ते ५५ फूट खोल असलेल्या खाणीत त्यांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
१० फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे.






