लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच... (File Photo : Crime)
अमरावती : चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यात ती गर्भवती राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. या घटनेत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे समोर आले असून, याप्रकरणात पोलिसांनी शनिवारी (दि.14) एका 22 वर्षीय तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : दोन शाळकरी मुलींचा पाठलाग केला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीला एका 22 वर्षीय आरोपी तरुणाने फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली. त्यानंतर, शुक्रवारी अल्पवयीन मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिने मुलाला जन्म दिला. आई अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास येताच चिखलदरा पोलिसांना ही माहिती देण्यात आली.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकावर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार, 19 वर्षीय तरुणावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी शेजारी राहण्यास आहे. त्याने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने एका निर्जनस्थळी नेऊन तिच्याबरोबर अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या बालिकेने याची माहिती आईला दिली नाही. काही दिवसांनी मात्र तिने आरोपीविरु्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! उधारी मागितल्याने डोक्यात दगड घालून केला तरुणाचा खून; पोलिसांनी 24 तासांत लावला छडा