मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीवाले
अटक केलेल्या आरोपींचे नाव मुकेश ब्रिजमोहन कोरी, ब्रिज मोहन देवताप्रसाद कोरी वय 52 वर्ष, सुशीला ब्रिजमोहन कोरे वय ४८ वर्ष आहे. एक भाजीवाल्याच्या टोळी कडून दुसरा भाजीवाल्याच्या टोळीला सातत्याने डिवचण्याचा जुना राग धरून हा वाद विवाद झाला. आणि यात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. अनधिकृत फेरीवाल्यांकडून हाणामारीची घटना घडल्यानंतर स्थानिककडून मुंबई महानगरपालिका विरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून या अनधिकृत फेरीवालेवर कारवाई केली जात नसल्यामुळे एवढा दादागिरी वाढली असल्याची आरोप देखील केली जात आहे.
ट्रान्सजेंडर गटाकडून 19 वर्षीय तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरीचा धक्कादायक आरोप
मुंबईच्या मालाडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ट्रान्सजेंडर गंगकडून महाविद्यालयीन १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला ब्लॅकमेल आणि जबरदस्तीने जेंडर सर्जरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारीत काय नमूद
मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर 2025 ला मालाड येथील ट्रान्सजेंडर गँगच्या आरोपींनी तरुणाला सूरतच्या रुग्णालयात नेले होते. त्यानंतर त्या तरुणाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आरोपींनी त्याचे जेंडर बदलत शस्त्रक्रिया केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत आहे. भिक्षा मागण्यास भाग पाडणे, पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि सततच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. तसेच आरोपींना दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा त्या तक्रारीत करण्यात आला आहे. पीडिताने 4 नोव्हेंबरला पळून सुटका करुन घेतली, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पीडित तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या या तक्रारीत पोलिसांना तात्काळ या प्रकरणाचा चौकशीला सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. या तरुणाची पोलीस कसून चौकशी देखील करत आहेत. या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याबाबत देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान,ज्या रुग्णालयात तरुणाचा इच्छेविरुद्ध जाऊन आरोपींनी त्याचे जेंडर बदलत शस्त्रक्रिया केली आहे, त्या रुग्णालयाचे रेकॉर्ड तपासण्याचं काम केली सुरु करण्यात आलं आहे
Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई
Ans: गोरेगाव
Ans: तिघे
Ans: भाजीविक्रेता






